Obesity: दलिया कि ओट्स! वजन कमी करण्यासाठी पौष्टीक पर्याय कोणता?

वजन खूप वाढलेलं असताना रोजच्या आहारात काय खायचं असा प्रश्न पडतो
daliya-ots for weight loss-Obesity
daliya-ots for weight loss-Obesity

वजन खूप वाढलेलं असताना रोजच्या आहारात काय खायचं असा प्रश्न पडतो. वजन तसेच पर्यायाने पोट कमी करणं हे खूप आव्हानात्मक असतं. तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम (Exercise) करणं गरजेचं असतं. शिवाय आहारावरही (Diet) लक्ष देणं गरजेचं असतं. वजन कमी करताना आहार योग्य प्रमाणात घेतला तर फायदा होतो. त्यामुळे तुम्ही डाएटमध्ये विविध पदार्थांचा समावेश करतात. काही लोकं यासाठी ओट्स, दलिया खाणं पसंत करतात. पण वजन कमी करण्यासाठी यापैकी योग्य पदार्थ (Food) कोणता? हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

daliya-ots for weight loss-Obesity
'ही' पाच फळं नियमित खाल्ल्याने वजन होईल कमी!
ओट्स
ओट्स

ओट्स खाण्याचे फायदे - ओट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. तसेच त्यात बीटा ग्लुकन असते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. फायबरचे प्रमाण चांगले असल्याने चयापचय क्रिया गतिमान होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. नाश्त्याला ओट्स खाल्ल्यामुळे खूप काळ भूक लागत नाही. पोटही भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. ओट्स हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूड मानले जाते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच हृदय राहते. नियमित ज्यूससोबत ओट्स खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होते.

daliya-ots for weight loss-Obesity
नाश्ता, जेवणाची योग्य वेळ कोणती? आयुर्वेद काय सांगते जाणून घ्या!
दलिया
दलिया

दलिया खाण्याचे फायदे - दलियात आयर्न, मॅग्नेशियम, फॉलेट, कॉपरने समृद्ध असतो. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये दलिया खाणे फायद्याचे मानले जाते. दलिया हे संपूर्ण धान्यापासून बनवले जाते. त्यामुळे ते पोषक तत्वांनी समृद्ध असते. त्यात फायबर असते, त्यामुळे तुम्ही मर्यादित प्रमाणात हे खाऊ शकता. वजन कमी करताना बद्धकोष्ठतेसारख्या समस्या अनेकांना निर्माण होतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. दलियात फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात. वजन कमी करण्यासाठी दलिया खाणे चांगले मानले जाते. त्यात असणाऱ्या प्रोटीनमुळे तुमचे मेटाबॉलिजम वाढते शिवाय तुमचे वजन नियंत्रित करणारे हार्मोन्सही यामुळे सक्रिय होतात. मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी दलिया खूप फायद्याचा असतो. दलिया खाऊन तुम्ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करू शकता.

daliya-ots for weight loss-Obesity
ओट्स की कॉर्न फ्लेक्स! नाश्त्यासाठी योग्य पौष्टीक पर्याय कोणता?

दोघांपैकी पौष्टीक काय?

काही लोकांना दलिया तर काहींना ओट्स आवडतात. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ तुम्ही खाऊ शकता. पण जर तुम्हाला या पदार्थांपासून चमचमीत काहीतरी बनवायचे असेल तर जास्त तेलाचा वापर करू नका. महत्वाचं म्हणजे, दलिया आणि ओट्समध्ये पौष्टीक घटक समप्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दोन्ही पदार्थ खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com