esakal | घरी उरलेल्या पालक पनीरपासून बनवा पुलाव, चव आणखीन वाढेल
sakal

बोलून बातमी शोधा

पालक पनीर पुलाव

घरी उरलेल्या पालक पनीरपासून बनवा पुलाव, चव आणखीन वाढेल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - घरी पालक पनीरची भाजी उरली आहे. त्याने तुम्ही स्वादिष्ट पालक पनीर पुलाव बनवू शकता. या पुलावला रायत्याबरोबर गरमागरम खाता येईल.

साहित्य

--

पालक पनीर , दोन कप उकडलेले भात, १ टेबलस्पून तूप, १ तेजपत्ता, थोडेसे जीरे, ४-५ काळ्या मिरच्या, २ इलायची, २ बारीक कापलेली हिरवी मिरची, मीठ आणि काळी मिरची पावडर चवीनुसार, एका लिंबाचा रस

कृती

---

- सर्वप्रथम कढईत तूप टाका

- त्यात तेजपत्ता, जीरा, काळी मिरची, इलायची आणि हिरवी मिरची भाजून घ्या.

- आता त्यात पालक पनीर टाका. त्यात भात टाका

- ते चांगल्या प्रकारे मिक्स करा. वरुन मीठ व काळी मिरची पावडर टाका. लक्षात ठेवा अगोदरच पालक पनीरमध्ये मीठ असल्याने जास्त मीठ टाकू नका.

- ते काही वेळा झाका. साधारण दोन मिनिटानंतर उघडून पाहा. ते खालीवर करुन घ्या.

- आता त्यावर लिंबाचा रस टाका

- हा पुलाव मोठ्या भांड्यात काढून घ्या. वरुन जास्त गावरान तूप टाका. गरमागरम पालक पनीर पुलाव कांदा आणि रायत्याबरोबर खा. (या पुलावमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि पुदिना टाका. याने चव आणखीन वाढेल.)

loading image
go to top