Palak Recipe: अनोख्या पध्दतीने पालक भाजी कशी करावी?

लुसलुशीत हिरवीगार पालक भाजी येण्याचा हिवाळ्यात सिजन असतो
Palak Recipe
Palak RecipeEsakal

तुम्ही पालक पनीर, पालक हिरव्या भाज्या, मटर पालक किंवा दाल पालक अशा भाज्या अनेक वेळा खाल्या असणार,पण आज आम्ही  तुम्हाला अगदी अनोख्या पद्धतीने पालक भाजी कशी तयार करायची याची रेसिपी सांगणार आहोत.

लुसलुशीत हिरवीगार पालक भाजी येण्याचा हिवाळ्यात सिजन असतो आणि हिवाळ्यात पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषणघटक आपोआप तयार होत असतात. इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला आणि भाजी तयार करायला देखील सोपी आहे. 

चला तर मग बघू या हेल्दी आणि चवदार पालक भाजी अनोख्या पद्धतीने कशी तयार करायची याची रेसिपी..

साहित्य

1) पालक अर्धा किलो

2) एक वाटी बेसन

3) एक कांदा बारीक चिरलेला

4) दोन बारीक चिरलेले टोमॅटो

5) लसुन

6) लाल तिखट

7) धना पावडर

8) मिठ

9) गरम मसाला

10) हळद

Palak Recipe
Recipe : पार्टीसाठी घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी; तळलेले मसाला बटाटा


कृती:

सर्व प्रथम, पालक बाछी स्वच्छ निवडून धुवून घ्यावी. नंतर धुतलेली भाजीची कुकर मध्ये एक शिटी काढून घ्यावी किंवा पॅनमध्ये हलके वाफवून घ्यावी. 

यानंतर, पालक थंड करून मोठ्या मिक्सरमध्ये पाणी न टाकता उकडलेल्या पालक भाजीचा प्युरी करून घ्यावी.

यानंतर पालक भाजीची ती प्युरी एका बाऊल मध्ये  काढुन घ्यावी आणि त्यात अर्धी वाटी बेसन घालावे.नंतर या मिश्रणात अंदाजे मीठ घालून 3-4 मिनिटे चांगले फेटून घ्यावे. हे मिश्रण इडलीच्या पिठासारख कराव. 

नीट फेटल्यानंतर हे मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये पसरवा.

Palak Recipe
Recipe: ढाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करायची?

यानंतर हे मिश्रण वाफवण्यासाठी एका पातेल्यात किंवा कढईत पाणी भरून त्यावर एक मोठी वाटी ठेवून त्यावर मिश्रणाने भरलेली प्लेट ठेवावी.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्येही वाफवू शकता. साधारण 5 मिनिटांच्या वाफेत हे पिठ ढोकळ्यासारखे कडक होईल, त्यानंतर त्याचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. यानंतर पॅनमध्ये तेल टाका आणि बारीक चिरलेला कांदा घालावा.

नंतर मिक्सरमध्ये दोन मोठे टोमॅटो आणि थोडे लसूण, हिरवी मिरची एकत्र बारीक करून घ्यावे. कांदा चांगला परतला की त्यात टोमॅटोची लसुन हिरवी मिरची याची प्युरी टाकावी आणि मसाला चांगले तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा.

Palak Recipe
Travel Recipes Ideas: प्रवास करतांना नेमके कोणते खाद्यपदार्थ सोबत ठेवावे?

यानंतर या मिश्रणात हळद, धनेपूड, गरम मसाला आणि टेस्टनुसार मीठ टाकावे .तसेच वाफवलेल्या पालक वड्या यात सोडून घ्याव्या. नंतर या भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटे ही भाजी शिजु  द्यावी. अशा रितीने अनोख्या पद्धतीची ही पालक भाजी तयार आहे. तुुम्ही ही भाजी पोळी, भात, नान यासोबतच खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com