Travel Recipes Ideas: प्रवास करतांना नेमके कोणते खाद्यपदार्थ सोबत ठेवावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food To Carry While Travelling

Travel Recipes Ideas: प्रवास करतांना नेमके कोणते खाद्यपदार्थ सोबत ठेवावे?

प्रत्येकाला आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा भेटावा म्हणून कुठेतरी बाहेर फिरायला जाणे प्रवास करणे या  गोष्टी आवडतच असतात. तुम्ही पण जर का असाच कुठेतरी  जाण्याचा किंवा प्रवास करण्याचा ठरवला असेल तर?

तुम्ही विचारत करत असाल की काय पॅक करावे किंवा कोणत्या गोष्टी आपल्यासोबत घ्याव्यात?

जेणेकरून आपल्याला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे प्रवासात कोणकोणत्या गोष्टी खायला सोबत ठेवाव्या. जेणेकरून त्या घरच्या पदार्थामुळे आपली भुक जाईल आणि हे पदार्थ दीर्घकाळ ताजे राहतील, हेही महत्त्वाचे आहे. 

चला तर मग आजच्या या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी प्रवास करतांना नेमके कोणते खाद्यपदार्थ सोबत ठेवावे याविषयीची खास माहिती आणली आहे.

हेही वाचा: Recipe: ढाबा स्टाईल अंडा करी कशी तयार करायची?

1) लिंबू पुदिन्या पाणी

प्रवासादरम्यान पाण्याचा बॉटल सोबत ठेवणे आवश्यक आहे, पण तुम्ही पाण्याच्या बॉटल सोबत लिंबू पुदिन्याचे पाणी देखीर सोबत ठेवू शकता. 

कसे करावे हे पाणी तयार?

पुदिन्याची पाने कुस्करून घ्यावे आणि नंतर त्या पाण्यात लिंबाचा रस, थोडे मीठ आणि साखर टाकावी अशा पध्दतीने लिंबू पुदिन्या पाणी तयार होईल.

2) पराठे

मेथीचे पराठे, तिखट-मिठाच्या पुऱ्या, गोड दशम्या असे पदार्थ सोबत ठेवल्यामुळे तुम्हाला कुठेही खाण्या-पिण्याची चिंता करण्याची गरज नाही. मात्र पुरी, थेपले अथवा दशमी दूधात मळून तयार करा. ज्यामुळे त्या काही दिवस मऊ राहतील. बाहेरगावी जाताना तुम्ही घरी तयार केलेली पुरणपोळी नक्कीच घेवून जावू शकता. पुरणपोळी हा पदार्थ किमान दोन ते तीन दिवस फ्रेश राहतो. शिवाय पुरळपोळी खाण्याने तुमचे अथवा मुलांचे पोट नक्कीच भरू शकते

हेही वाचा: Paneer Samosa recipe: घरच्या घरी कसा तयार करायचा पनीर समोसे?

3) इंस्टंट फुड

आजकाल घरीच इंस्टंट नाश्ता करून ठेवण्याची अनेक महिलांना सवय असते. शिवाय बाजारात देखील असे पदार्थ सहज उपलब्ध असतात. समजा तुम्ही एखाद्या परप्रांतामध्ये फिरण्यासाठी गेला असाल आणि तिथे तुमच्या आवडीचे पदार्थ उपलब्ध नसतील तर इंस्टंट शिरा, उपमा, कप न्युडल्स असे पदार्थ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.

4) मुखवास

काहीजणांना जेवणानंतर मुखवास खाण्याची सवय असते. अशा लोकांनी घरूनच एखादे मुखवास तयार करून नेल्यास प्रवासात तुमची गैरसोय होणार नाही. मुखवासामुळे तुमचे पचन चांगले होईल शिवाय तुम्हाला उलटी अथवा मळमळीचा त्रासही होणार नाही. यासोबतच थोडासा सुकामेवा आणि काही दिवस टिकतील अशी ताजी फळेही बरोबर घ्या.

Web Title: Travel Recipes Ideas Which Foods Should You Carry While Traveling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..