एकापेक्षा जास्त डाळी वापरून तयार करा चटपटीत पदार्थ

panchmel dal prepare to this way and its beneficial for health in kolhapur
panchmel dal prepare to this way and its beneficial for health in kolhapur

कोल्हापूर - 

साहित्य - 

1/4 कप मूग डाळ, 1/4 कप मसूर डाळ, 1/4 चना डाळ, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 1 कप बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा तूप, 1/2 छोटा चमचा लाल मिर्च, 1 छोटा चमचा गरम मसाला, आवश्यकतेनुसार 1 लिंबूचा रस, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 3 कप लसूण, चिमूटभर हळद, आवश्यक्तेनुसार पाणी आणि मीठ

कृती - 

सगळ्या डाळींना एकत्र करून त्यांना 2-3 वेळा पाणी घालून चांगल्याप्रकारे धुवून घ्या. धुतलेल्या डाळी कूकर मध्ये घालून आवश्यक्तेनुसार पाणी घाला. पाण्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर त्यात मीठ आणि हळद घालून कूकर झाकून घ्या. आणि 5 -6 शिट्ट्या होऊ द्या.                                                

एका पॅन मध्ये तूप टाकून ते गरम करून घ्या. त्यात हिंग, जिर, लसूण, कांदा टाकून 2 ते 3 मिनीट भाजून घ्या.कांद्याचा रंग सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. कांद्याचा रंग बदलला की, त्यात चिरलेला टोमॅटो टाका.

त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. 1-2 मिनीट शिजवून घ्या. मग त्यात शिजवलेल्या डाळी घाला. डाळ घालून या मिश्राणाला 5 मिनीटपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर यात वरून लिंबू रस, गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून काही मिनीट शिजवून घ्या. मग गॅस बंद करा.         

तुमची पांचमेला डाळ तयार आहे.ही डाळ चावल किंवा रोटी सोबत तुम्ही सर्व्ह करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com