esakal | बनवा पनीर कोरमा, जाणून घ्या रेसिपी | Paneer Korma
sakal

बोलून बातमी शोधा

पनीर कोरमा

बनवा पनीर कोरमा, जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतीय स्वयंपाक घरात पनीर असतोच. तुम्ही ग्रेव्ही, करी किंवा स्नॅक्ससारखे टिक्का किंवा कटलेट बनवत असाल तर पनीर कोणत्याही डिशला चविष्ट आणि आरोग्यदायी बनवते. बहुतेक पनीरचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवले असेल. येथे आम्ही तुमच्यासाठी पनीर कोरमाची रेसिपी घेऊन आलो आहोत. तर चला पनीर कोरमा रेसिपीविषयी जाणून घेऊ या...

साहित्य

- २५० ग्रॅम पनीर

- २ टोमॅटो (बारीक कापलेले)

- १ कांदा

- ४-५ काजू

- २ वाळलेल्या मिरच्या

- १ दालचिनीच्या काड्या

- १ तेजपत्ता

- २ लवंग

- १ लाल मिरची पावडर

- १ टी स्पून धने पावडर

- १ / २ टी स्पून काळी मिरची

- मीठ

- दही

हेही वाचा: ब्रेडचे गुलाबजाम; वाचा सोपी रेसिपी

कृती

- एक पॅन घ्या. त्यात कापलेले टोमॅटो, कांदा, लाल मिरची, अद्रक, लसूण, लवंग, दालचिनी, तेजपत्ता टाकून भाजून घ्या. भाजल्यानंतर ते एकत्र करुन घ्या.

- ते एक पॅनमध्ये टाकून शिजू द्या. ग्रेव्ही शिजेपर्यंत पनीरचे क्यूब्स घ्या आणि ते तळून घ्या.

- ग्रेव्हीत लाल मिरची पावडर, काळी मिरची, धनिया पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. ते एकत्र करुन घ्या. थोडीशी दही टाकून पुन्हा शिजवा. पुन्हा पनीर क्युब्समध्ये टाका. मध्यम आंचवर पाच मिनिटे आणि पुन्हा बारीक आंचवर आणखीन पाच मिनिटांपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर ते वाटीत काढा आणि तळलेला कांद गार्निश करा. पनीर कोरमा खाण्यासाठी तयार आहे.

loading image
go to top