esakal | विकेंडची सरुवात एका सोप्या रेसिपीने; पनीर लॉलीपॉप, एकदा ट्राय कराच
sakal

बोलून बातमी शोधा

विकेंडची सरुवात एका सोप्या रेसिपीने; पनीर लॉलीपॉप, एकदा ट्राय कराच

विकेंडची सरुवात एका सोप्या रेसिपीने; पनीर लॉलीपॉप, एकदा ट्राय कराच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : जेव्हा आपण शुक्रवारचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात पिक्चर किंवा फिरणे, वीकेंड या गोष्टी येतात. शुक्रवारच्या विकेंडला आपण मित्रांना भेटणे किंवा आराम करणे याला पसंती देतो. याशिवाय फॅमीली सोबत टाइम्स स्पेंड करणे किंवा फिरायला जाणे अशा काही गोष्टींचा आपण प्लॅन करतो. या कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्याने काही लोकांना घराबाहेर पडण्यास, फिरण्यास वेळ मिळत नाही. इतर दिवशी विकेंडला बाहेर जाणारे आपण सर्वजण सध्या घरीच परिवारासोबत बसून काही गोष्टीचा आनंद घेत आहोत. यावेळी फॅमिलीसोबत काही वेळ गप्पा, खेळ, ड्रिंक्स, सिरीज, पिक्चर याचा आनंद घेतला असतो. दरम्यान या स्नॅक्समध्ये पनीर लॉलीपॉप हा ऑप्शन तुम्ही ऍड करू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी कमी कालावधी लागतो. तसेच हे कोणत्या ड्रिंक सोबत खाल्ले जातात. तुम्ही चहा, कॉफी, ज्युससोबत पनीर लॉलीपॉप ट्राय करू शकता. तर आपण आज ही रेसिपी कशी बनते हे पाहणारा आहोत.

बनवण्याची पद्धत

एका कटोरी मध्ये किसलेला पनीर घ्या आणि त्यामध्ये उकळलेले बटाटे सोलून टाका. या मिश्रणात कोथंबीर, कापलेली सिमला मिरची, लाल मिरची पावडर, जिरे पावडर. गरम मसाला. चाट मसाला. आले-लसूण पेस्ट हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर या मिश्रणाला दहा मिनिटे आराम द्या. त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून द्या. मैद्याच्या पिठात बुडवून घ्या आणि याला ब्रेडक्रम्स सोबत लावून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करा त्यामध्ये हे पनीर बॉल्स घाला आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते फ्राय करा. पनीर लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहेत. केचप सोबत तुम्ही ही डिश सर्व्ह करु शकता.

loading image