झटपट पनीर पराठा

राजश्री बिनायकिया, चिंचवड, पुणे
Saturday, 21 March 2020

प्रथम पनीर किसणीवर किसून घ्यावे. नंतर त्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर सर्व व्यवस्थित मिक्स करावे. मिश्रण एकत्र करून घ्यावे. नंतर गव्हाचे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यामध्ये मोहनासाठी तेल किंवा तूप व चवीनुसार मीठ घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ओवा पावडर घालावी. पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्यामध्ये पनीरचे सारण भरावे व छोटेछोटे पराठे लाटावेत. तव्यावर दोन्ही बाजूने तूप घालून व्यवस्थित खरपूस रंगावर भाजून घ्यावेत. गरमागरम पराठे दही किंवा लोण्याबरोबर सर्व्ह करावेत.

साहित्य - अडीचशे ग्रॅम पनीर, अडीच वाटी गव्हाचे पीठ, एक टेबल स्पून तूप किंवा तेल मोहनासाठी, चवीनुसार मिरची पावडर, मीठ, साखर, हळद, दोन चमचे जिरे पावडर, एक चमचे ओवा पावडर, दोन चमचे धने पावडर, पाव वाटी धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, पराठे भाजण्यासाठी तूप किंवा तेल.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कृती - प्रथम पनीर किसणीवर किसून घ्यावे. नंतर त्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर सर्व व्यवस्थित मिक्स करावे. मिश्रण एकत्र करून घ्यावे. नंतर गव्हाचे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यामध्ये मोहनासाठी तेल किंवा तूप व चवीनुसार मीठ घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ओवा पावडर घालावी. पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. पाच ते दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्यामध्ये पनीरचे सारण भरावे व छोटेछोटे पराठे लाटावेत. तव्यावर दोन्ही बाजूने तूप घालून व्यवस्थित खरपूस रंगावर भाजून घ्यावेत. गरमागरम पराठे दही किंवा लोण्याबरोबर सर्व्ह करावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paneer paratha recipe