esakal | Food : पीयूष
sakal

बोलून बातमी शोधा

Food : पीयूष

Food : पीयूष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीकृष्णाचे नाव निघाले आहे, तर आज पीयूषची रेसिपी पाहू या.  पीयूष म्हणजे श्रीखंडात पाणी घालून तयार झालेला पदार्थ नव्हे. ही एक खास रेसिपी आहे.

साहित्य : ५०० ग्रॅम दही,  पाऊण वाटी साखर, १ टीस्पून वेलदोडा पूड,  पाव टीस्पून जायफळ पूड, ६ ते ७ काड्या केशर, किंचित मीठ, पिवळा रंग.

 कृती : प्रथम एका पातेल्यावर पातळ (सुती) पंचा ठेवून त्यावर दही ओतून ते अर्धा तास टांगून ठेवावे. नंतर पातेल्यात काढून साखर, वेलची पूड, जायफळ पूड, केशर, किंचित मीठ, पिवळा रंग घालावे. साखर विरघळेपर्यंत रवीने घुसळावे. ग्लासमध्ये ओतून वरून बदाम पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करावे.

loading image
go to top