आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी

तुम्ही नॉन- व्हेज खायला आवडते का? मग तुमच्यासाठी खिशाला परवडतील आणि चविष्ट नॉनव्हेज थाळी मिळतील अशा पुण्यातील 10 ठिकाणांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आखाड पार्टीसाठी तुम्हाला हे नक्कीच उत्तम पर्याय ठरतील.

1: बारामती थाळी (Baramati Thali)

बारामतीचे एक प्रेमळ जोडपे चालवत असलेले भोजनालय एमजी रस्त्याच्या मागच्या गल्लीतील ताबुत रस्त्यावर आहे. या छोट्याशा भोजनालयात तुम्हाला स्वादिष्ट शाकाहारी, अंडी, मासे, मटण, चिकन आणि पाय थाळी मिळेल. ते नदीतील माश्यांचा वापर करतात आणि परफेक्टली शिजवलेले असतात. त्यांच्याकडील फ्राईड फिश बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असतो. अतिशय चवदार मसल्यांच्यासोबत मटन शिजवल्यामुळे मटन थाळी अतिशय चविष्ट लागते. पाया थाळी सोडून इतर प्रत्येक थाळीमध्ये दोन प्रकारच्या ग्रेव्ही, चपाती किंवा भाकरी आणि भात असतो. प्रत्येक थाळी एका व्यक्तीला पुरेल एवढी असते. तुम्ही तेथून नक्कीच उपाशी परतणार यांची खात्री आहे.

Baramati Thali
Baramati ThaliBaramati Thali

थाळीची किंमत : 130 रुपयांपासून पुढे

सर्व्हिस : टेक अवे सर्व्हिस सुरू

पत्ता : 676, ताबूत रस्ता, महानज रेस्टॉरंट जवळ, कॅम्प, पुणे, महाराष्ट्र 411001

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
आखाड स्पेशल : नॉन-व्हेज तडक्याचा बेत 'या' डिशनं करा झणझणीत

2. रेसिपी नॉन व्हेज (Recipe Non Veg)

भांडारकर रस्त्यावर काही महिन्यांपुर्वीच सुरु झाले असून येथे मटन आणि चिकन थाळी मिळते. मटण थालीमध्ये साजूक तुपातील(घरगुती) बनविलेले मटण फ्राय, आळनी, एक वाटी खीमा आणि दोन प्रकारचे रस्से बनलेले असतात. मटन अगदी व्यवस्थित शिजवलेले असून अळणी अतिशय चविष्ट आहे. थाळीमध्ये ते चपाती किंवा ज्वारीची भाकरी आणि इंद्रायणी भात देतात. चिकन थाळीमध्ये देखील हेच रस्सा असतो पण पर्याय म्हणून खीमा आणि कुरकुरीत तळलेले पॉपकॉर्न दिला जातो. शहरातील उत्तम थाळीपैकी नक्की ही एक थाळी आहे.

Recipe Non Veg
Recipe Non VegRecipe Non Veg

थाळीची किंमत : 250 पासून पुढे

सर्व्हिस : डाईन-इन, टेक अवे , नो- कॉन्टक्ट डिलिव्हरी

पत्ता : मिलेनियम टॉवरच्या तळमजला, कॉसमॉस बँक, मुख्य, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र 411004

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
रात्रीच्या जेवणासाठी टेस्टी पालक कबाब बनवा, जाणून घ्या रेसिपी

3. स्वाद फिश हाऊस : (Swad Fish House)

साधरण वर्षभरापुर्वी हडपसरमध्ये पहिली शाखा सुरु झाली त्यानंतर वानवरीमध्ये दुसरी शाखा सुरु झाली. आयटी जॉब सोडून खाद्यप्रेमी मालकाने हा व्यवसाय सुरू केला. बोंबिल, बांगडा, पापलेट सुरमई, रावस या सी-फूड ही स्वादची स्पेशालिटी आहे. प्रत्येक थालीमध्ये विविध प्रकारचे फ्राईड सीफूड, एक करी, हिरवी चटणी, चपाती, भात आणि सोल कडी असते. सी-फूडसाठी खिशाला परवडणाऱ्या ठिकाणांपैकी नक्कीच हे ठिकाण आहे.

Swad Fish House
Swad Fish HouseSwad Fish House

थाळीची किंमत : : 200 रुपयांपासून पुढे Rs 200

पत्ता: बिल्डिंग, शॉप नं.33, भोसले गार्डन रोड. त्रिवणी नगर, हडपसर, पुणे सोलापूर महामार्ग,महाराष्ट्र 411028

सर्व्हिस : डाईन-इन, टेक-अवे, डिलिव्हरी

ऑर्डर : झोमॅटो, स्विगी

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
प्रत्येकजण म्हणेल वाह! सायंकाळच्या चहासह बनवा बेसन क्रिस्पी डोसा

4: सत्कार राईस प्लेट हाऊस Satkar Rice Plate House

सन 1963 मध्ये मुंबईत सत्कार राईस प्लेटची सुरवात झाली. पुण्यातील सिंहगड रोड येथील ब्रांच नवीनच आहे. हे रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ असून येथे चविष्ट थाळी मिळतात. येथील खिमा थाली आणि पापलेट थाळी कमाल आहे. खीमा थाळीमध्ये खीमा, चवदार ग्रेव्ही आणि सोलकढी असते. पापलेट थालीमध्ये एक आख्खा फ्राईट पापलेट आणि करी सोबत दिली जाते. दोन्ही थाळींमध्ये दोन ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी असतात किंवा तीन चपात्या आणि एक वाटी भातही दिला जातो.

=

Satkar Rice Plate House
Satkar Rice Plate HouseSatkar Rice Plate House

थाळीची किंमत210 पासून पुढे

सर्व्हिस : डाईन-इन, टेक अवे , नो- कॉन्टक्ट डिलिव्हरी

पत्ता: दुकान क्रमांक 1, एन्क्लेव क्रमांक 1, आदित्य नाकोडा एन्क्लेव, सिंहगड रोड, पुणे, महाराष्ट्र 411030

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
Paneer Stuffed Pakoda Recipe: पावसात या डिशचा आनंद घ्याच

5. मासा : Massa

मासा हे छोटेसा 7 टेबल असलेले ढाबा स्टाईल हॉटेल आहे. मुंढव्यामध्ये असेलेल्या या हॉटेलमध्ये विविध थाळी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. येथील चिकन स्पेशल थाली सुरमई रवा फ्राय थाली एकदम झक्कास आहे. सुरमई थाळीमध्ये साजुत तुपात तळलेले रवा फ्राईड सुरमई दिली जाते. दोन्ही थाळीमध्ये एक सुका नॉनव्हेज पदार्था आणि 2 वाटी करी दिली जाते. दोन बाजरी किंवा ज्वारीची भाकरी आणि वाटीभर भात दिला जातो. दख्खन प्रदेशात जशी चुलीतल्या जळत्या लाकडावर ठेवून भाजल्या जातात तशाप्रमाणे भाजलेल्या भाकरी इथे दिल्या जातात. तुम्हाला जर छोट्या जागी खायला आवडत असेल तर हा उत्तम पर्याय आहे.

Massa
MassaMassa

थाळीची किंमत :170 पासून पुढे

सर्व्हिस : डाईन-इन,टेक अवे

पत्ता : पत्ता: क्रमांक 61/बी, रेल्वे स्टेशन रोड, मुंढवा, पुणे, महाराष्ट्र 411036

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
Recipe: गटारी स्पेशल! नक्की ट्राय करा 'हिरवं चिकन'

6: सुर्वेज प्युअर नॉनव्हेज (Surves Pure NonVeg)

मटणप्रेमींसाठी हे रेस्टॉरंट स्वर्ग आहे असे म्हटले जाते. साताराच्या दोन भावांनी मिळून हे हॉटेल सुरू केले आहे. हे रेस्टॉरंट म्हणजे रेफ्रिजरेटर कम किचन आहे असे समजले जाते.दररोज ताजे फ्रेश मटण आणले जाते. येथील मुख्य आकर्षन मटन आणि चिकन आहे. तुम्ही पहिल्यांदा येथे जाणार असाल तर थाळी ऑर्डर करा, तुम्हाला सर्व काही एकाच थाळीत मिळेल. मटण थाळीमध्ये घडीची चपाती(पातळ लेअर असलेली) किंवा ज्वारीची भाकरी, मटन फ्राय, मटण रस्सा, खिम्मा, पांढरा रस्सा आणि पुलाव दिला जातो.

Surves Pure NonVeg
Surves Pure NonVegSurves Pure NonVeg

थाळीची किंमत : 200 पासून पुढे

सर्व्हिस : डाईन-इन, टेक अवे , नो- कॉन्टक्ट डिलिव्हरी

पत्ता: चाणक्यपुरी ग्राउंड, 1199/बी, फर्ग्युसन कॉलेज रोड, चैतन्य पराठा जवळ, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र 411004

ऑर्डर : झोमॅटो, स्विगी

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
SolKadhi recipe : मालवणी स्टाइल सोलकढी

7. हॉटेल जगदंब Hotel Jagdamba

पुण्यापासून एक तासाच्या अंतरावर पुणे-बंगळूरू महामार्गावर शिवापूरमध्ये हॉटेल जगदंब येथे ग्राहकांची प्रंचड गर्दी असते. स्पेशली जेवणाच्या वेळेत आणि विकेंडच्या वेळी येथे ग्राहकांच्या लांब रांगा लागतात. रस्सा आणि थाळीमध्ये हे हॉटेल बेस्ट सेलर म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही चिकन-मटन थाळी मागवू शकता. प्रत्येक थाळीमध्ये अनलिमिटेड रस्सा, भात, ज्वारी किंवा भाकरी आणि फ्राईज मटण मिळते. थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुपाचा भरपूर वापर होतो आणि येथे भात देखील चविष्ट स्टॉक(मटण किंवा चिकनचे शिजवलेले पाणी)

Hotel Jagdamba
Hotel JagdambaHotel Jagdamba

थाळीची किंमत :130 पासून पुढे

सर्व्हिस : टेक अवे , डिलिव्हरी

पत्ता: मजूर अड्ड्या समोर, वारजे ब्रिज, वडगाव, सर्व्हिस रोड, वारजे, पुणे, महाराष्ट्र 411058

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
आवडते सूप बनवा आणखी स्वादिष्ट, ही 'किचन टीप्स' वापरा

8: हॉटेल स्वराज : सोलापुरी मटण थाळी (Hotel Swaraj ़, Solapuri Mutton Thali)

पुण्यात एकमेव सोलापूर मटण थाळी मिळणारे ठिकाण म्हणजे हॉटले स्वराज. चविष्ट मटण थाळीमध्ये फ्राईड मटण पासून ते मटणाच्या रस्सा आणि स्वादिष्ट मटण बिर्याणीसह 7 मटण

डिशेस असतात. येथील फुड थोडे आईली आणि कमी तिखट आहे. तुम्हाला साधी चपाती किंवा तांदळाची भाकरी थाळीमध्ये दिली जाते. येथे सोल कढी देखील उत्तम मिळते.

Hotel Swaraj Solapuri Mutton Thali
Hotel Swaraj Solapuri Mutton ThaliHotel Swaraj Solapuri Mutton Thali

थाळीची किंमत : 280 रुपयांपासून पुढे

सर्व्हिस : टेक अवे

पत्ता : 200 B शुक्रवार पेठ, चिंचेची तालीम जवळ, शुक्रवार पेठ, पुणे, महाराष्ट्र - 411002

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
Stuff Idli Roll: रेसिपी पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

9: दख्खन स्पाईस (Deccan Spice)

वाकड येथील दख्खन स्पाईसमध्ये तोंडाला पाणी सुटेल अशी थाळी मिळते. येथे तुम्हाला सी-फूड, चिकन मटण आणि अंडा थाळी मिळते. दख्खन स्पाईसची बांगडा थाळी अतिशय उत्तम आहे. या थाळीत सेमी स्पाईसी मसाला फ्राईटसह क्रिस्पी फ्राईड फिश मिळतो. प्रत्येक थाळीत सुक मटण(फिश फ्राय किंवा मटण/चिकन सुक) , अनलिमिडेड रस्सा, रोटी/ चपाती, भाकरी, इंद्रायणी भात, रायता मिळते. तुम्ही आख्खी थाळी चाटून पुसून खाल.

Deccan Spice
Deccan SpiceDeccan Spice

थाळीची किंमत :190 च्या पुढे

सर्व्हिस : डाईन-इन, टेक अवे , नो- कॉन्टक्ट डिलिव्हरी

पत्ता: 25, प्लॉट नं, सेक्टर, 59, प्राधिकरण रोड, निगडी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411044

ऑर्डर : झोमॅटो

आखाड स्पेशल : पुण्यात खिशाला परवडतील अशा 10 नॉन-व्हेज थाळी
Papdi Chaat Recipe: पावसाळ्यात घरीच बनवा ही सोप्पी रेसिपी

10.आवरे मराठा खानावळ (Aware Maratha Khanawal)

सदाशिव पेठेत तुमच्या खिशाला परवडेल अशा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी देणारे दुसरे कोणते रेस्टॉरंट मिळणार नाही. आवरे खानावळमध्ये 7 प्रकारच्या मटण थाळी आणि 4 प्रकारच्या चिकन थाळी आणि 2 प्रकाराच्या अंडा थाळी तुम्हाला मिळतील. त्यांच्याकडे मटन मसाला पासून कलेजी थाळी पर्यंत सर्व काही मिळते. या थाळीमध्ये ग्रेव्ही, सुक मटण, दोन भाकरी(ज्वारी किंवा बाजरी), तीन चपाती, खीमा वाटी किंवा अंड, भात आणि रस्सा दिला जातो. येथील हिरवा मसल्याची खर्डा चिकन थाळी नक्की ट्राय करा.

Aware Maratha Khanawal
Aware Maratha KhanawalAware Maratha Khanawal

थाळीची किंमत : 100 पासून पुढे

सर्व्हिस : डाईन-इन, टेक अवे , नो- कॉन्टक्ट डिलिव्हरी

पत्ता: 536, जोंधळे चौक, आर. बी. कुमठेकर रोड, पंताचा गोट, सदाशिव पेठ, कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे, महाराष्ट्र 411030

ऑर्डर : झोमॅटो, स्विगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com