
Poha Oats Cutlet Recipe: आजच्या धकाधकीच्या जीवनात चटपटीत आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थांची गरज प्रत्येकाला भासते. जर तुम्ही काहीतरी नवीन आणि स्वादिष्ट बनवण्याच्या विचारात असाल, तर पोहा ओट्स कटलेट रेसिपी ट्राय करु शकता. पोहा आणि ओट्स हे दोन्ही पदार्थ पौष्टिक आणि सहज उपलब्ध असतात. ही कटलेट्स चहासोबत नाश्ता, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी बनवायला सोपी असून कमी वेळ तयार होणारी आहे. मसालेदार चव आणि कुरकुरीत पोत यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही कटलेट्स आवडतील. यात बटाटे, भाज्या आणि मसाल्यांचा समतोल वापर केला जातो, ज्यामुळे पोटही भरते आणि आरोग्यही जपले जाते. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट पोहा ओट्स कटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.