जागतिक पोहे दिन : भारतीय संस्कृतीतील लोकप्रिय नाष्टा म्हणजे पोहे

world pohe day.jpg
world pohe day.jpg

7 जून हा दिवस म्हणजे ‘जागतिक पोहे दिन’ म्हणून साजरा केला जातो.  भारतीय संस्कृतीतील लोकप्रिय नाष्टा म्हणजे पोहे. पोहे, कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, शेंगदाणा, शेव, टोमॅटो, फोडणीचा थाट कडीपत्ता घालून मिरचीच्या तडक्यासह लिंबू अथवा दह्यासोबत घालून तयार केलेले गरमागरम खमंग पोहे...वाह हे सर्व वाचून तुमच्याही तोंडाला पाणीच सुटलं असेल ना. पोह्यांचा नाष्टा माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार पोहे करण्याची पध्दती आणि चव वेगवेगळी आहे. त्यामुळे संपूर्ण भारताने पोह्याच्या नाश्‍त्याला पसंती आहे.
महाराष्ट्राचा आवडता नाश्‍ता म्हणजे कांदेपाहे. सर्वांना परवडणारे आणि झटपट तयार होणारे कांदेपोह्यांची चवच न्यारी. घर, कॉलेज कॅटींग, चहाची टपरी, चौकाचौकात उभे राहिलेले नाश्‍ता पॉईट आणि हॉटेल्स या सर्व ठिकाणी कितीही नवनवीन डिशेश उपलब्ध असले तरी त्यातील एक पदार्थ म्हणजे कांदे पोहे. या कांदेपोह्यांना सर्वत्र पसंती मिळत असते. गडबडीच्या वेळेला, कमी वेळेत, कमी श्रमात, चटकन तयार होणारा, पोटभरणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.  प्रत्येक घरात सर्वाधिक वेळा तयार होणाऱ्या पदार्थांच्या यादीत कांद्यापोह्याला दुसरा कुणी स्पर्धक नसेलच. त्याचं कारण म्हणजे अगदी झटपट आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारी ही कांदेपोह्याची डिश. 
महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृतीवर कितीही अतिक्रमण झालं असलं तरी काही पदार्थाचे अस्तित्व आजही तसेच कायम टिकून आहेत.  पोहे हा पदार्थ सुखदुखातील दोन्हीही प्रसंगी बनवले जातात. म्हणजेच घरी पाहुणा आला तर झटपट खमंग पोहे बनवले जातात. तर घरात एखादी दु:खद घटना घडली असेल तर तेव्हा शेजारी किंवा नातेवाईक पोहे घेवून येतात. आजही कांदेपोहे खाण्याची क्रेझ कमी झाली नाही. 
कांदेपोहे कार्यक्रम
 कांदेपोहे कार्यक्रम म्हटंल तर आजही काही मुलींच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही.  मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात तर पोहे हे ठरलेलेच असतात.  आपल्या मराठी संस्कृतीमध्ये लग्नाची पहिली बैठक म्हणजे कांदे-पोह्यांचा कार्यक्रम. मुलीला पाहुणे बघायला आल्यावर चहा, एखादा गोड पदार्थ आणि पोहे हे ठरलेले समीकरणच.  ज्या पोह्यांच्या साक्षीने अनेकांची लग्न जुळली जातात, त्या कार्यक्रमाला कांदेपोहे कार्यक्रम म्हणतात. यादिवशी पोह्याला विशेष महत्त्व असते. दोन जीवांना एकत्र आणण्याची ही पहिली पायरी.  नव्या नात्यांची सुरुवात कांदे-पोहे या कार्यक्रमाने सुरु होते. 
वेगवेगळ्या प्रातांत पोह्यांचे वेगळे नाव
महाराष्ट्र  -      पोहे
कोकणी   -     फोवू
नेवाडी    -     बाजी
 कन्नड   –  अवालक्की
तेलगू    -      अटुकूल
गुजराती  -      पौआ
 तामिळ आणि मल्याळ  – अवल
भोजपुरी आणि नेपाळी  - चिऊरा
बंगाल आणि आसाम   - चिडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com