
Healthiest Ragi oats cupcake recipe: व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली असून आज प्रपोज डे साजरा केला जात आहे. या दिवशी जोडपी एकमेकांना प्रेम व्यक्त करतात. प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या प्रकारे आनंदी करण्याचे मार्ग शोधतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही अनोख्या पद्धतीने खूश करण्याचा विचार करत असाल आणि त्याला खाण्यापिण्याची आवड असेल, तर तुम्ही यंदा प्रपोज डे ला त्याच्यासाठी रागी ओट्स कपकेक बनवू शकता. रागी ओट्स कपकेक बनवणे सोपा असून आरोग्यदायी देखील असते. चला तर मग जाणून घेऊया रागी ओट्स कपकेक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.