Quick Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त मसाला फ्रेंच टोस्ट, लगेच नोट करा रेसिपी

Masala French Toast Recipe For Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी आणि प्रोटीनयुक्त मसाला फ्रेंच टोस्ट रेसिपी नक्की लिहून घ्या.
Masala French Toast
Masala French Toastsakal
Updated on

Morning Breakfast Masala French Toast Recipe: कधी कधी सकाळी कामाला उशीर होत असेल तेव्हा नाश्त्यात काय बनवायचं हे सुचत नाही. पण काळजी करु नका. पुढे दिलेली मसाला फ्रेंच टोस्टची रेसिपी लगेच लिहून घ्या. ही प्रोटीनयुक्त रेसिपी तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडेल.

साहित्य

अंडी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दूध किंवा पाणी, ब्रेड

Masala French Toast
Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट

कृती

एक वाटीत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,हळद, मीठ, कोथिंबीर आणि दूध किंवा पाणी घालून फेटून घ्या. त्यात अंडी फोडा आणि पुन्हा सगळं एकत्र फेटा.आता ब्रेडचे त्रिकोणी काप करा किंवा एक आख्खा ब्रेड तसाच या मिश्रणात बुडवून दोन्ही बाजूने सगळं मिश्रण लावून घ्या. नंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यावर थोडा तेल लावून घ्या.

आता मिश्रणात बुडवलेले ब्रेडचे काप त्यावर भाजायला ठेवा. त्यावर अजून मिश्रण घालून व्यवस्थित पसवरून घ्या. मध्यम आचेवर भाजून थोड्यावेळाने ब्रेड पलटी करा आणि दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्या. असे बाकीचे ब्रेडसुद्धा भाजून घ्या. गरमगरम मसाला फ्रेंच टोस्ट तयार आहेत. आता हिरवी चटणी किंवा केचअप सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com