

Sattu Paratha Recipe
sakal
Easy and Healthy Summer Breakfast Recipes: उन्हाळा सुरू झाला की शरीराला हलकं, पचायला सोपं आणि थंडावा देणारं अन्न खाण्याची गरज वाढते. अशा वेळी नाश्त्यात काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न पडतो. भारतीय घरांमध्ये पराठा हा कायमचाच आवडता पर्याय असला, तरी उन्हाळ्यात तो थोडा जड वाटू शकतो. म्हणूनच या दिवसांत सत्तू पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. भाजलेल्या हरभऱ्यापासून तयार होणारा सत्तू शरीराला ऊर्जा देतो, पोटभर ठेवतो आणि उष्णतेतही हलकं वाटतं. त्यामुळे हा पराठा चव आणि आरोग्य यांचा परफेक्ट समतोल साधतो.