Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधनाला भावाला खाऊ घाला टेस्टी अन् चटपटीत पनीर कोफ्ता

ही टेस्टी डिश खाऊन पुन्हा पुन्हा ती बनवण्याची मागणी तुमच्या भावासह कुटुंबियांकडून होईल
Raksha Bandhan Special Recipe
Raksha Bandhan Special Recipe esakal

Raksha Bandhan Special Recipe : रक्षाबंधन या सणाला अगदी काहीच दिवस उरले असून लोक या दिवशी वेगवेगळ्या पदार्थांच्या मेजवाणीचा बेत आखतात. तर दुसरीकडे बहीण भावाचे गिफ्ट देण्यासाठीचे यावेळी खास प्लानिंग चालू असते. या रक्षा बंधाला तुमच्या भावाला अगदी टेस्टी अशी पनीर कोफ्त्याची डिश खाऊ घाला. ही टेस्टी डिश खाऊन पुन्हा पुन्हा ती बनवण्याची मागणी तुमच्या भावासह कुटुंबियांकडून होईल. चला तर ही डिश बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

पनीर कोफ्त्यासाठी लागणारे साहित्य

पनीर (किसून घेतलेले)

शिमला मिर्ची

कांदा

बारीक कापलेले गाजर

चिली फ्लेक्स

हिरवी मिर्ची

काळी मिर्ची पावडर

ऑरिगॅनो

मीठ

लिंबू

मैदा

कॉर्न फ्लोअर

तेल

ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य

कांदा

टोमॅटो

तेल

दही

लसणाच्या कळ्या

आलं

काजू

काश्मिरी लाल मिर्ची

काश्मिरी लाल मिर्ची पावडर

मसालेदार लाल मिर्ची पावडर

हळद

धणे पावडर

कसूरी मेथी

मीठ

दही क्रीम (Recipe)

Raksha Bandhan Special Recipe
Raksha Bandhan 2023 : भाऊ-बहिणीचं अनमोल नातं, या 5 गोष्टींची काळजी घेतली तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा

बनवण्याची पद्धत

कोफ्ते बनवण्यासाठी बारीक किसलेले पनीर घ्या. यात बारीक चिरलेली शिमला मिर्ची, कांदा, बारीक चिरलेले गाजर, चिली फ्लेक्स, हिरवी मिर्ची पावडर, ऑरिगॅनो, मीठ, लिंबू त्यात घाला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता त्यात थोडा मैदा घाला. आता गोल कोफ्ते तयार करून घ्या. आणि कॉर्न फ्लोअरने कोटिंग करा. आता तेल गरम करा आणि त्यात कोफ्ते चांगल्या प्रकारे शेकून घ्या. (Food)

Raksha Bandhan Special Recipe
Breakfast For Glowing Skin : आरोग्य सुधारण्याबरोबरच चेहऱ्यावरचं तेज वाढवणारे नाश्त्याचे 8 प्रकार

आता ग्रेव्ही तयार करून घ्या. त्यासाठी तेल गरम करा. आणि त्यात दही विरघळून घ्या आणि त्यात जीरा चटणी टाका. आता त्यात कांदे, टोमॅटो, लसणाच्या कळ्या, आलं, काजू आणि काश्मीरी सगळी लाल मिर्ची घाला. आता ही ग्रेव्ही थंड होऊ द्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात ग्रेव्ही टाका आणि चांगल्या प्रकारे शिजू द्या. शिजल्यानंतर त्यात काश्मीरी लाल मिर्च पावडर, मसालेदार लाल मिर्ची पावडर, गरम मसाला, हळद, धणे पावडर, कसूरी मेथी, मीठ चांगल्या प्रकारे शिजू द्या. शेवटी त्यात दही मिसळा. आता कोफ्ते यात घाला आणि त्यात दो तीन चमचे क्रीम मिसळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com