Ranbhaji Recipe : पाथरीची सुकी भाजी कशी तयार करायची?

पाथरीची भाजीही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो.
Pathri Suki Bhaji
Pathri Suki BhajiEsakal

Pathri Suki Bhaji: भारतात भाज्यांच्या सुमारे 55 हजार प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या ग्रामीण भागात विशेषत्वाने मागवल्या व खाल्ल्या जातात. या रानभाज्या सोप्या व साध्या पद्धतीने बनवल्या जातात. पाथरीची भाजीही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते, म्हणून अपचन झाल्यास ही रानभाजी खाण्याचा सल्ला दिल्या जातो. तसेच कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे. या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो. अशा बहुगुणी पाथरीची सुकी भाजी कशी तयार याची रेसिपी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

Pathri Suki Bhaji
Adhik Mahina 2023: धोंडाच्या महिन्यात जावयाला चांदीचे वाण का देतात? 

साहित्य :

दोन जुडी पाथरीची भाजी

कांदे २, बारीक चिरलेले

अर्धा वाटी तुरडाळ 

लसूण 

तिखट 

मीठ चवीनुसार

तेल 

एक चमचा शेंगदाणा कूट

Pathri Suki Bhaji
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

कृती :

सुरूवातीला पाथरीची भाजी , स्वच्छ धुवून, चिरून घ्यावी. नंतर पातेल्यात पाणी घेऊन त्यात तुरडाळ घालून पाथरीची चिरलेली भाजघ उकडून घ्यावी. पुढे मग पाणी गार झाल्यानंतर पाने पिळून घ्या व पाणी टाकून द्यावे.कढईमध्ये तेल गरम करून कांदा परतून घ्यावा. त्यात ठेचलेला लसूण, तिखट व भाजी टाकुन भाजी चांगली परतून घ्यावी. भाजी परतल्यावर त्यात दाण्याचा कूट व चवीनुसार मीठ घाला. भाजी परतवून वाफेवर शिजवून घ्यावी. अशा रितीने आपली पाथरीची सुकी भाजी तयार झाली आहे.ही भाजी तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत खावु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com