ग्लॅम-फूड : ‘डाएट प्लॅन’ शक्यतो दीर्घकालीनच हवा! Randeep Hooda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

randeep hooda
ग्लॅम-फूड : ‘डाएट प्लॅन’ शक्यतो दीर्घकालीनच हवा!

ग्लॅम-फूड : ‘डाएट प्लॅन’ शक्यतो दीर्घकालीनच हवा!

- रणदीप हुडा

रणदीप हुडा हा बॉलिवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला पंजाबी पद्धतीचे खाद्यपदार्थ अधिक आवडतात. मुळात हरियानवी असलेल्या रणदीपसाठी ‘पराठा आणि त्यावर लोण्याचा गोळा’ म्हणजे जिभेला तृप्त करणारा पदार्थ आहे. याशिवाय तंदुरी रोटी आणि दाल तडका, कोबी-बटाटा आणि गाजर मेथीशिवाय आयुष्यात मजा नसल्याचेही तो सांगतो. बटाट्याची भाजी आणि चुरमा हे त्याचे मोस्ट फेव्हरेट पदार्थ आहेत.

फिट राहण्यासाठी रणदीप ‘लॉंग टर्म डाएट प्लॅन’ फॉलो करतो. सध्याच्या क्रॅश डाएटिंग आणि बिन्ज-इटिंग या संकल्पनेच्याही तो विरोधात आहे. त्याच्या मते, बॉडी परफेक्ट शेपमध्ये येण्यासाठी हा मार्ग पुरेसा योग्य नसून, त्यासाठी दीर्घकालीन डाएट प्लॅनचे पालन करणे गरजेचे आहे. दिवसाची सुरुवात तो भरपूर पाणी पिऊन करतो. तो त्याचा ब्रेकफास्ट कधीही टाळत नाही. रात्री शक्यतो हलका आहार घ्यायला तो प्राधान्य देतो. त्याच्या आहारात भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश असतो.

स्पॅनिश ऑम्लेट सँडविच, एग सॅलड विथ टोमॅटो अँड अवकॅडो या पदार्थांचा तो डाएट प्लॅनमध्ये आवर्जून समावेश करतो. याशिवाय डेअरी प्रॉडक्ट्सही त्याला भरपूर आवडतात. चीज, दूध आणि दह्याचाही समावेश तो आपल्या आहारात करतो. हाय प्रोटिन पदार्थ खाण्याकडे त्याचा कल अधिक आहे. फ्रेंच फ्राईज, सुशी तो आवडीने खातो. रणदीपला गोडाचे पदार्थ प्रचंड आवडतात. ‘हॉट चॉकलेट फज’ हे त्याचे फेव्हरेट आहे. जंक फूड खायाला त्याला अजिबात आवडत नाही. ‘प्याज का पराठा विथ व्हाईट बटर’ हा त्याचा वीकनेस असल्याचे तो सांगतो.

‘सरबजीत’ चित्रपाटाच्या वेळी तो आपल्या डाएट प्लॅनमुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने ९४ किलो वजन तब्ब्ल ६६ किलोंवर आणले होते. वजन कमी करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. तो काही दिवस फक्त ‘वॉटर डाएट’ फॉलो करायचा. सिक्स पॅक ॲब्ज मिळवण्याकडे त्याचा अजिबातच कल नाही. कारण त्याच्या मते ‘शरीर हे आतून स्ट्रॉंग असले पाहिजे. बाहेरून ते कसे दिसते, याला फारसे महत्त्व दिले जाता काम नये.’

loading image
go to top