esakal | Ladoo Recipe : आरोग्याला फायदेशीर; बनवा झटपट रवा-नारळ लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

रवा-नारळ लाडू

Ladoo Recipe : आरोग्याला फायदेशीर; बनवा झटपट रवा-नारळ लाडू

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

लाडू म्हटंल की तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. लाडूमध्ये अनेक प्रकार आहेत. जसं की बेसनचा लाडू, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू असे अनेक प्रकार केले जातात. पूर्वी सणासुदीला असणारा हा पदार्थ आता रोजच्या ताटात आला आहे. त्यातून लहान मुलांचे खाण्याचे नखरे. यातून मग गृहिणी मार्ग काढत आरोग्याला फायदेशीर ठरतील अश्या लाडू रेसिपीची शोध लावतात. अशीच एक हेल्दी रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. जी करायला ही सोपी आहे. आणि खायला ही चविष्ट. ती म्हणजे रवा नारळ लाडू नारळ.

साहित्य- दोन वाट्या रवा, दीड वाटी साखर, एक खणलेला नारळ, पाच-सहा वेलदोड्याची पूड बेदाणे, बदामाचे काप

कृती : एका पातेल्यामध्ये तूप घालून मंद आचेवर रवा गुलाबी रंगावर खमंग भाजून घ्या. रवा भाजून होत आला की त्यात नारळाचा चव घालून थोडे भाजून खाली उतरवा .रव्यावर वेलदोड्याची पूड व बेदाणे घाला. नंतर दीड वाटी साखरेत पाऊण वाटी पाणी घालून पाक तयार करा .एक तारी पाक तयार करून गॅस बंद करून रवा व नारळाचे मिश्रण त्यात घालावे व मधून मधून ढवळून घ्यावे .हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागले की तीन-चार तासांनी मिश्रण लाडू करण्याजोगे होईल मग हाताने मध्यम आकाराचे लाडू वळा . यामध्ये अंदाजे 18 ते 20 लाडू होतात नारळ घातल्यामुळे लाडू चवीला छान लागतो. मऊ होतो. पण जास्त टिकत नाही, या लाडू मध्ये खवा पण घातला तरी चालतो.

टीप:

रवा खमंग भाजावा. पांढरट भाजला तर रव्याचे लाडू दिसायला चांगले दिसले तरी खायला खमंग लागत नाहीत.

loading image
go to top