esakal | कच्च्या आंब्याला घरातच अशा पद्धतीने पिकवा बाजारातील आंब्या पेक्षाही अधिक स्वादिष्ट

बोलून बातमी शोधा

कच्च्या आंब्याला घरातच अशा पद्धतीने पिकवा बाजारातील आंब्या पेक्षाही अधिक स्वादिष्ट
कच्च्या आंब्याला घरातच अशा पद्धतीने पिकवा बाजारातील आंब्या पेक्षाही अधिक स्वादिष्ट
sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : आंबे पिकवण्यासाठी अनेक वेळा रसायनांचा वापर केला जातो. परंतु तुम्ही घरातच कोणतेही रसायन न वापरता चांगल्या पद्धतीने आंबे पिकवू शकता. आपण या ठिकाणी आंबे पिकवण्याची पद्धत जाणून घेऊया

उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सिझन येतो. देशात विविध भागांमध्ये आंबे विक्रीला येऊ लागतात .अनेक लोक या आंब्याचे इतके शौकिन असतात कि जर आसपास कुठे आंबे मिळाले नाही तर अनेक किलोमीटर दूर जाऊन ते आंबे खरेदी करतात. परंतु त्यांना हे माहीत नसते की हे आंबे कशा पद्धतीने पिकवले आहेत. अनेक वेळा हे आंबे कार्बाईडच्या माध्यमातून पिकवलेले असतात. असे आंबे शरीरासाठी हानिकारक असतात. अशावेळी झाडालाच पिकलेल्या आंब्याचे सेवन करा अथवा कच्चे आंबे आणून घरामध्ये पिकवा. आज आपण या ठिकाणी कच्चे आंबे पिकवण्यासाठी काही टिप्स देत आहोत. ज्यामुळे तुम्ही घरामध्ये कोणतेही केमिकल न वापरता आंबे पिकवू शकता.

भाताचा खरा वापर

भाताचा वापर करून आपण आंबे सहजपणे पिकवू शकतो. भातामध्ये पिकलेले आंबे अन्य पद्धतीने पिकवलेल्या आंब्या पेक्षा अत्यंत स्वादिष्ट असतात. यासाठी तुम्हाला घरामध्ये एक ते दोन फूट खोलीचा डबा असणे आवश्यक आहे. या डब्यांमध्ये भात घालून त्यामध्ये चार ते पाच दिवसांसाठी कच्चे आंबे ठेवावेत. पाच दिवसानंतर ते आंबे पूर्णपणे पिकलेले तुम्हाला दिसतील. अशाच पद्धतीने अन्य फळे तुम्ही या भाताच्या माध्यमातून पिकवू शकता.

पेपरचा करा उपयोग

ज्या वर्तमान पेपर चा कागद तुम्ही तर रद्दी मध्ये घालता तेच कागद तुम्हाला आंबे पिकवण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्ही तीन ते चार पेपर कागद घेऊन त्यामध्ये आंबे गुंडाळून एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. त्यावरती एखादे भांडे अथवा बुट्टी झाकून ठेवा. तीन ते चार दिवसात आंबे तुम्हाला सहजपणे पिकलेले दिसतील. अशा पद्धतीने पिकलेले आंबे खाल्ला की बाजारात पिकलेल्या आंब्याला विसरून जाल.

गवताचा करा उपयोग

आपल्या बागेमध्ये असलेल्या गवताचा वापर आपण आंबे पिकवण्यासाठी करू शकतो. एका प्लास्टिक च्या कोणत्याही साधनांमध्ये हे गवत ठेवा आणि त्यामध्ये कच्चे आंबे घालून थंड असलेल्या जागेवर पिकवण्यासाठी ठेवा. अशा पद्धतीने आपण घरातच एक ते दोन दिवसात आंबे नैसर्गिक रित्या पिकवू शकतो.

सुती कपड्यांचा करा वापर

सुट्टी कपड्याचा वापर करून आपण आंबे सहजपणे पिकवू शकतो. एक सुती कापड घेऊन त्यामध्ये आंबे घालून ते गुंडाळून कपाटांमध्ये अथवा स्टोअर रूम मध्ये दोन ते तीन दिवस ठेवा. तीन दिवसानंतर आंबे सहजपणे पिकलेले आढळतील. अशाच पद्धतीने आपण आणि फळे सुद्धा टिकू शकतो कच्ची केळी पिकवण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा वापर केला जातो.