esakal | कच्ची पपईपासून बनवा चटणी,स्नॅक्स; वाचा सेसीपी

बोलून बातमी शोधा

कच्ची पपईपासून बनवा चटणी,स्नॅक्स; वाचा सेसीपी

कच्ची पपईपासून बनवा चटणी,स्नॅक्स; वाचा सेसीपी

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद: कच्ची पपईपासून बनवलेल्या चटणीने ना केवळ चव वाढते तर ते स्नॅक्सबरोबर खाण्याचा आनंद घेऊ शकता. तर चला हे बनवायचे कसे ते जाणून घ्या...

साहित्य

- कच्ची पपई - १५० ग्रॅम, गुळाचा चुरा - २०० ग्रॅम, सिरका / व्हिनेगर- १/२ कप, लाल मिरची पावडर - १/२ टिस्पून, काळी मिरची पावडर - एक चिमूटभर, लसूण - ६ पाकळ्या ( बारीक केलेली), तुळसी - सहा पाने (बारीक केलेले), किशमिश - २ टेबलस्पून, हिंग - चिमूटभर, जिरा पावडर - १/२ टीस्पून, मीठ - चवीनुसार

कृती

- सर्वप्रथम पपई सालटे काढून ती बारीक करा

- आता एका भांड्यात पपई, गुळाचा चुरा, सिरका, लाल मिरची पावडर, जीरा पावडर, काळी मिरची पावडर, लसूण, तुलसी, हिंग, किशमिश आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या. आता या मिश्रणाला पाच तासांसाठी झाकून ठेवा.

- जवळजवळ पाच तासानंतर मिश्रण मोठ्या गॅसवर पाच मिनिटांपर्यंत शिजवून घ्या.

- पुन्हा मध्यम गॅसवर चमच्याने हलवून ते दहा मिनिटांपर्यंत शिजवा

- आता गॅस बंद करा

- पपईची चटणी खाण्यासाठी तयार

Edited By- Archana Banage