कोंड्याचा मांडा खाल्लात का?जाणून घ्या रेसिपी Food Recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंड्याचा मांडा
कोंड्याचा मांडा खाल्लात का?जाणून घ्या रेसिपी Food Recipe

कोंड्याचा मांडा खाल्लात का? जाणून घ्या रेसिपी

तुम्ही भुकेल्या वेळी घरी (Home) असाल तेव्हा तुमच्या आई-आजीने समोर दिलेला एक वेगळा पदार्थ (Food) खाऊन तुम्ही अहाहा... असं म्हटलं असेलच. पण नावं विचारल्यावर तुमची प्रतिक्रिया काहीतरी वेगळीच असेल. तो कसा केला हे विचारल्यावर तर आणखीनच आश्चर्य वाटेल. असा तो चमचमीत पदार्थ आहे कोंड्याचा मांडा.

हेही वाचा: विकी कौशलला आवडतो रताळ्याचा परोठा!त्याच्या आईने केलेली गंमत वाचा

एखाद दिवशी भाजी करण्याचं तंत्र चुकलं कींवा इतर काही गोष्टींमुळे भाजी उरली तर ती कशी संपणार असा प्रश्न निर्माण होतो. मग काय, या भाजीला आई-आजी ट्विस्ट देतात. भाजी अगदी बारीक करून त्यात तांदूळ, डाळीचे, उडीद पीठ शिवाय गरज असल्यास कांदा घातला जातो. तसेच तिखट,मीठ कोथिंबीर असतेच. हे सगळं एकत्र करून एकतर त्याचे थालिपीठ किंवा भजी करतात. ही भजी टोमॅटो सॉसबरोबर चविष्ट लागतात. मुलांना तर तरी खूप आवडतात.

हेही वाचा: चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या..

असा करा कोंड्याचा मांडा (How TO Make)

समजा तुमच्याकडे कांद्याच्या पातीची भाजी उरलेली असेल तर ३ मोठ्या वाट्या कांद्याची पात, तिखट, मीठ, ओवा, ३ चमचे डाळीचे पीठ, दीड चमचे तांदूळाचे पीठ आणि उडीद पीठ एकत्र करून मिश्रण चांगले एकत्र करावे. एकीकडे तेल गरम करावे. त्यात या मिश्रणाचे गोळे खमंग तळून घ्यावेत. तळल्यावर ते आतून नीट शिजले नाहीत असे वाटत असेल तर गोळे हातावर थापून मग तेलात सोडावेत. छान खरपूर आतून तळले जातात. शिवाय चविष्टही लागतात. तुम्ही ब्रेड, पोळीबरोबर सहज ते खाऊ शकता. जोडीला चहा मात्र हवाच.

हेही वाचा: मटण आवडतं! मग, हा प्रकार खाण्याआधी फायदे-तोटे जाणून घ्या

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :food recipefood news'food
loading image
go to top