खवय्ये असाल तर राजस्थानची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

मात्र राजपूत किंवा इतर समाजातील लोक ही मांसाहारप्रेमी आहेत.

कोल्हापूर : राजस्थानी खाद्यसंस्कृती मध्ये एक वेगळी परंपरा आणि संस्कृती आहे. या खाद्यसंस्कृतीला हजारो वर्षापासूनचा पारंपरिक इतिहास जोडला गेला आहे. हंगामानुसार, संस्कृतीनुसार आणि लोकांच्या राहणीमाना नुसार वेगवेगळ्या भाज्या, आयुर्वेदिक औषधे, आणि मसाले यांचा प्रभाव येथे दिसून येतो. खाद्यपदार्थ तयार करत असताना इथे काही प्रक्रियांचे पालन केले जाते. एक सर्वोत्कृष्ट राजस्थानी भोजनाची थाळी आणि खडा मसाल्यांचा उत्तम वापर करुन तयार झालेली असते. यामध्ये विशिष्ट व्यंजनाबद्दल आपण बोललो तर प्रत्येक व्यंजनाची एक वेगळी कहाणी आहे. आणि यामध्ये प्रत्येकाला ऐतिहासिक महत्त्व आहे

ज्या राजस्थान योजनांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार आहेत. यामध्ये मारवाडी समाजातील लोक मासांहाराचे खवय्ये आहेत. मात्र राजपूत किंवा इतर समाजातील लोक ही मांसाहारप्रेमी आहेत. पौराणिक काळात मांस जंगल, युद्ध, क्षेत्र आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे राजपुताना समाजाच्या आहारातील हा एक अनिवार्य हिस्सा बनला आहे.

राजस्थानी मांस व्यंजनमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. लाल मांस, जंगली मांस आणि सफारी मांस आहेत. वेगवेगळ्या उत्सवा दरम्यान राजस्थानी थाळीत मिळते. परंतु सर्वांत शांत आणि आरामदायक भोजन म्हणून आलू गोश्ते जे घरी सोप्या पद्धतीने बनवली जाणारी मटन रेसिपी आहे. ज्यामध्ये खडा मसाला, क्लेवर फुल बटाट्याचे मोठे तुकडे असतात. तर ही रेसिपी आपण आता जाणून घेणार आहोत.

या रेसिपीमध्ये तुम्हाला मध्यम आणि मोठ्या आकारात मटणाचे तुकडे आणि त्याच आकारात गोल किंवा अंडाकार बटाटे घ्यायचे आहेत. यांना मोठ्या आकारामध्ये कट करायचे. या मसाल्यासाठी कांदा, लसूण, आले, लाल मिरची पावडर, धने पावडर, लवंग, काळी दालचीन, मीठ, दही, तेल हे सर्व एकत्र करायचे. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, मसाल्याला स्वाद मिळेपर्यंत मसाला शिजवुन घ्यायचा आहे. हे मिश्रण शिजल्यानंतर यामध्ये उकडलेले बटाटे दही कट केलेला कांदा हे सर्व हे सर्व शिजवून घ्यायचे. एकत्र शिजवण्यासाठी तुम्ही प्रेशर कुकरचा वापर करू शकता. परंतु आम्ही तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो हे पूर्णपणे नीट शिजण्यासाठी तुम्ही याला मंद आचेच्या गॅसवरही शिजवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the recipe of aloo gosht in rajasthan how to prepare in kolhapur