esakal | रेसिपी + : डिलिशिअस ओरिओ केक
sakal

बोलून बातमी शोधा

delicious-oreo-cake

केक न आवडणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. घरच्या घरी केक बनवणेही आता सोपे झाले आहे. त्याचबरोबर इंटरनेटमुळे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेसिपी मिळवणेही सोपे झाले आहे. घरीच सोप्या पद्धतीने ओरिओ केक कसा करावा, याची रेसिपी आपण जाणून घेऊयात...

रेसिपी + : डिलिशिअस ओरिओ केक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केक न आवडणारी व्यक्ती सापडणे अशक्यच. घरच्या घरी केक बनवणेही आता सोपे झाले आहे. त्याचबरोबर इंटरनेटमुळे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेसिपी मिळवणेही सोपे झाले आहे. घरीच सोप्या पद्धतीने ओरिओ केक कसा करावा, याची रेसिपी आपण जाणून घेऊयात...

सामग्री - २० ओरिओ बिस्किटे, २ मोठे चमचे साखर, ½ चमचा बेकिंग पावडर, ½ कप दूध, १ कप व्हिपिंग क्रिम, १ कप डार्क चॉकलेट, ½ कप फ्रेश क्रिम.

कृती -

  • कॅडबरीचे ओरिओ हे बिस्किट घ्यावे. यामध्ये सध्या अनेक फ्लेवर उपलब्ध आहेत. त्यामधील चॉकलेट हा फ्लेवर घ्यावा व त्याची २० बिस्किटे घ्यावीत.
  • ही सर्व बिस्किटे मिक्सरला लावून भरडून घ्यावीत. हे करीत असताना बिस्किटांची चांगली बारीक पावडर होईल, याकडे लक्ष द्यावे. बिस्किटांमधील चंक्स तसेच राहिल्यास पुढे केक तयार होण्यास अडचण येते.
  • बॅटर बनवण्यासाठी मिक्सरमधून बारीक केलेली पावडर एका भांड्यात घ्यावी. त्यामध्ये दोन मोठे चमचे साखर, अर्धा कप दूध (उकळून गार केलेले), अर्धा चमचा बेकिंग पावडर घालावी. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
  • केक पॅनमध्ये बटर पेपर लावून त्याला बटर किंवा थोडेसे तेल लावावे. त्यामुळे बॅटर भांड्याला चिकटत नाही. तयार केलेले बॅटर समांतर भांड्यामध्ये पसरून घ्यावे.
  • फ्राय पॅन ५ ते १० मिनिटे गरम करून घ्यावा. गरम भांड्याखाली ठेवायचा छोटा स्टॅंड त्या पॅनमध्ये ठेवावा; जेणेकरून बॅटर असलेला केक पॅन त्यावर ठेवता येईल. मंद आचेवर हा पॅन फ्राय पॅनमध्ये अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा.
  • अर्ध्या तासाने झाकण बाजूला करून केक तयार झाला आहे का पाहावे. केकमध्ये टुथपिक टाकून केक झाला असल्याची खात्री करावी. केक न चिकटल्यास केक तयार आहे, याची खात्री होईल. केकला थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
  • फ्रोसिंट तुम्ही आवडत्या पद्धतीने करू शकता. सोप्या पद्धतीने करण्यासाठी व्हिपिंग क्रीम हॅंड मिक्सरने मऊ करून घ्यावी.
  • त्यानंतर पॅनमध्ये अर्धा कप फ्रेश क्रीम मंद आचेवर गरम करून घ्यावे. हे फ्रेश क्रीम अर्ध्या कप डार्क चॉकलेटमध्ये टाकून मिक्स करावे. हे मिश्रण व्हिप्ड क्रीममध्ये मिसळावे. हे मिश्रण फ्रिजमध्ये १५ मिनिटांसाठी ठेवावे.
  • केकचा बॅटर सावधगिरीने काढावा. थंड केलेले हे क्रीम केकवर लावावे.
  • आवडीप्रमाणे केकला सजवावे.