esakal | रेसिपी : हिरव्या मिरचीचा ठेचा
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : हिरव्या मिरचीचा ठेचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तिखट आणि मसालेदार झणझणीत पदार्थ ही विदर्भाची ओळख. लाल आणि हिरव्या मिरचीचा ठेचा वैदर्भीयांच्या विशेष आवडीचा. भाकरीसोबत तर ठेचा खाल्ला जातोच. त्याशिवाय रोजच्या जेवणातही अनेकदा ठेचा असतोच. जाणून घेऊया हिरव्या ठेच्याची रेसिपी.

वेळ: १० मिनीटे

साहित्य

१५ हिरव्या मिरच्या,

६ ते ७ लसणीच्या पाकळ्या

१/२ टिस्पून मिठ

१/२ टिस्पून तेल

हेही वाचा: नागपूरी तर्री-पोहे

कृती:

१) मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत, लसूण सोलून घ्यावे. पॅन गरम करण्यास ठेवावा. २-३ चमचे पाणी घालावे, मिरच्या आणि लसूण घालून मंद आचेवर साधारण ५ मिनीटे झाकण ठेवून वाफ काढावी.

२) वाफ काढली की झाकण काढून मिरच्या-लसूण कोरडे करून घ्यावे. गार झाले की मिठ घालून खलबत्त्यात कुटून घ्यावे.

३) तेल गरम करून कुटलेला ठेचा थोडावेळ परतून घ्यावा.

हा खरडा भाकरीबरोबर सुरेख लागतो.

टीप : ही बेसिक खरड्याची कृती आहे. यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर, जिरे, हिंग (तेलात घालावे) घालून शकतो. तसेच थोडा शेंगदाण्याचा कूटही घालता येतो (फक्त परत एकदा कुटावे). काही लोकांना भाजलेले तिळही घालायला आवडतात.

loading image
go to top