Recipe: घरच्या घरी खमंग असा बटाट्याचा चीला कसा तयार करायचा?

बटाटा चीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात गाजर, कोबी इत्यादी किसलेल्या भाज्या सुध्दा घालू शकता.
potato chila
potato chilaEsakal

बटाट्याचा चीला ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे जी तुम्ही घरच्या घरी काही मिनिटांत बनवू शकता. तुम्ही बटाट्याचा चीला ब्रेकफास्ट म्हणून, रात्रीच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत कधीही खाऊ शकता. 

चीला अधिक पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात गाजर, कोबी इत्यादी किसलेल्या भाज्या सुध्दा घालू शकता. यामुळे बटाटा चीला हा खूपच हेल्दी बनतो.आणि खायलाही चवदार लागतो त्यामुळे घरातील सगळेच सदस्य हा बटाटा चीला आवडीने खाऊ शकतात.

चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी खमंग असा बटाट्याचा चीला कसा तयार करायचा?

potato chila
Weekend Special Recipe : खमंग मटण खिमा समोसा कसा तयार करायचा?

साहित्य

● एक मोठा बटाटा

● एक चमचा लसूण पेस्ट

● अर्धा चमचा जिरे पावडर

● काळी मिरी

● एक चमचा मक्याचे पीठ

● तेल

● दोन मध्यम कांदा

● एक हिरवी मिरची

● अर्धा चमचा धने पावडर

● एक चमचा बेसन

● मीठ

potato chila
Navratri Recipe: चवदार मसालेदार साबुदाणा वडा कसा तयार करायचा?

कृती

प्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. आता ते चांगले किसून एका भांड्यात काढा. त्यात दोन कप पाणी घालावे आणि किसलेले बटाटे 15 मिनिटे भिजत ठेवावे. हे यातून बरेच स्टार्च काढून टाकण्यास मदत करेल. 15 मिनिटांनंतर जास्तीचे पाणी पिळून घ्या आणि बटाटे दुसऱ्या भांड्यात काढा. आता इतर सर्व साहित्य जसे चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, मीठ, धनेपूड, जिरेपूड, बेसन आणि कॉर्नफ्लोअर घालावे. मिश्रण तयार करण्यासाठी चांगले मिक्स करावे. नॉन-स्टिक तव्यावर तेलाचे काही थेंब टाकावे आणि तयार मिश्रणाचा अर्धा भाग त्यावर पसरवा. गोलाकार आणि पातळ चीला येण्यासाठी चांगले पसरवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. उरलेल्या मिश्रणातून दुसरा चीला बनवा. बटाट्याचा चीला टोमॅटो सॉस किंवा हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com