esakal | रेसिपी : महालक्ष्मी स्पेशल ज्वारीची आंबील
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : महालक्ष्मी स्पेशल ज्वारीची आंबील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उभ्या महालक्ष्म्या हा विदर्भातील मोठा सण. या सणाचा थाट लग्नासारखा असतो. सुंदर सजावट केली जाते. महालक्ष्म्यांना छान नटविले जाते. स्वयंपाकाचा थाट काय वर्णावा? सोळा भाज्या, सोळा चटण्या, वडा-पुरण. सगळ्यामध्ये मुख्य प्रसाद असतो ज्वारीच्या आंबीलीचा. आज जाणून घेऊया आंबीलीचा रेसिपी.

साहित्य :

 • ४-५ टेबलस्पून ज्वारीचे पीठ

 • ५ टेबलस्पून दही

 • २ टेबलस्पून शेंगदाणे

 • थोडसे खोबऱ्याचे काप

 • ५-६ कढीपत्त्याची पाने

 • १ टिस्पुन मोहरी

 • १ टेबलस्पून तिळ

 • १/२ टीस्पून हिंग

 • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या

 • १ टेबलस्पून तेल

 • चवीनुसार मीठ

 • २ ग्लास पाणी

हेही वाचा: गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड

कृती :

ज्वारीच्या पीठामध्ये पाणी घालून चांगले मिक्स करून रात्रभर भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी या भिजवलेल्या पिठात घुसळून घेतलेले दही मिक्स करावे. एका पॅनमध्ये तेल घालावे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग, कढीपत्ता घालावा. हिरवी मिरची शेंगदाणे खोबऱ्याचे काप, तिळ घालून एक मिनिट होऊ द्यावे.

आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालावे व पाण्याला उकळी आली की गॅस सिम वर करून भिजवून घेतलेले ज्वारीचे पीठ हळूहळू गरम पाण्यात सोडावे. चवीनुसार मीठ घालावे. दोन मिनिटे ही आंबील छान शिजवून घ्यावी

loading image
go to top