माझी रेसिपी : मोमोज 

ऋतुजा कदम 
Saturday, 18 April 2020

मोमोज हा प्रकार तिबेट, नेपाळ, सिक्कीम व दार्जिलिंग येथे प्रसिद्ध आहे.  हा प्रकार व्हेज किंवा नॉनव्हेज असू शकतो.  टेस्टी मोमोज घरीही सोप्या पद्धतीने करता येतात. 

मोमोज हा प्रकार तिबेट, नेपाळ, सिक्कीम व दार्जिलिंग येथे प्रसिद्ध आहे. ते मूळचे तिबेटचे. मोमो हे या पदार्थाचे नाव चिनी शब्द ‘मोमो’ (अर्थात steamed bread) वरून प्राप्त झाले आहे. हा प्रकार व्हेज किंवा नॉनव्हेज असू शकतो. टेस्टी मोमोज घरीही सोप्या पद्धतीने करता येतात. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहित्य : १ कप मैदा, तेल, मीठ, पाव कप पाणी, पाव कप बारीक चिरलेला कांदा, १ कप बारीक केलेला कोबी, पाव कप बारीक केलेले गाजर, १ टोमॅटो, १ चिरलेली हिरवी मिरची, ३ सुक्या लाल मिरच्या, जिरे, १ आलं, लवंग, काळी मिरी. 

कृती : 
१) एका भांड्यात मैदा घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ आणि तेल घाला आणि सर्व एकजीव करून घ्या. यामध्ये पाव कप पाणी टाकून मळून घ्या. या पीठाचा गोळा करून घ्या आणि ३० मिनिटांसाठी झाकून ठेवा. मोमोजच्या आतील स्टफिंग तयार करण्यासाठी एका भांड्यात बारीक केलेला कोबी, गाजर, कांदा, चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्या. या मिश्रणालाही ३० मिनिटांसाठी ठेवून द्या. 

२) तिखट शेजवान चटणीशिवाय मोमोज खाण्याची मजा नाही. ती तयार करण्यासाठी एका टोमॅटोचे दोन भाग करा आणि त्यासोबत ३ सुकलेल्या मिरच्या, एक चमचा पाणी, लसणाच्या पाकळ्या, जिरे, चिमूटभर मीठ टाकून मिक्सरला लावा. तुमची चटणी तयार. 

३) कोबी, गाजर, कांदा यांच्या स्टफिंगला एका फडक्यात घेऊन त्यातील पाणी पिळून काढावे. या स्टफिंगला एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये चिरलेली एक हिरवी मिरची, किसलेले आलं, काळीमिरी पावडर, चवीपुरतं मीठ टाका आणि मिक्स करा. 

४) तयार केलेल्या कणकेची लहान पुरी लाटून त्यात १ चमचा तयार सारण भरून साधारण मोदकाचा आकार द्या. 

५) कुकरमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये कुकरचा डबा आणि त्यावर जाळीदार प्लेट ठेवा. या प्लेटला तेल लावून तयार केलेले मोमोज वाफवून घ्या. 

६) स्टिम मोमोज चटणीसोबत खायला तयार. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recipe Momos

Tags
टॉपिकस
Topic Tags: