esakal | झटपट तयार करा मटर पुलाव अन् मसालेदार भाजीसोबत घ्या गरम पुलावचा आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

recipe of mutter pulav nagpur news

आज आम्ही सांगतोय त्या पद्धतीने मटर पुलाव बनवला तर नक्की सर्वांना आवडेल. मग चला तर बघुया मटर पुलावची रेसिपी...

झटपट तयार करा मटर पुलाव अन् मसालेदार भाजीसोबत घ्या गरम पुलावचा आनंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपण फ्राईड राईस, मसाला भात, लेमन राईस इत्यादी राईस ट्राय केले असेल. तुम्ही मटर पुलाव देखील खाल्ला असेल. पण, आज आम्ही सांगतोय त्या पद्धतीने मटर पुलाव बनवला तर नक्की सर्वांना आवडेल. मग चला तर बघुया मटर पुलावची रेसिपी...

तयारीसाठी लागणारा वेळ - १५ मिनिट
शिजण्यासाठी लागणार वेळ - ३० मिनिट
सर्विंग साइज - ०४

हेही वाचा - पाहुणपणाला आलेली महिला गावाला गेली, कपाट बघितले अन् कुटुंबीयांच्या पायाखालची सरकरली जमीन

सामग्री -

 • ६ कप शिजलेले बासमती तांदूळ
 • अर्धा कप हिरवे मटर
 • १ बारीक कापलेला कांदा
 • एक टीस्पून जीरा
 • ३ किसलेल्या लसूनच्या पाकळ्या
 • आल्याचा बारीक कापलेला एक तुकडा
 • २-३ इलायची
 • २ टेबलस्पून शुद्ध तूप
 • मीठ चवीनुसार
 • २ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 • एक टेबलस्पून कापलेले काजू

हेही वाचा - वैधानिक मंडळावर वैदर्भीय नेत्यांची एकजूट; राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

कृती -
मध्यम फ्लेमवर एका मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसून घाला. काही सेकंद त्याला तळून इलायची, दालचिनी, जीरा, लवंग आणि कांदा घाला. कांदा सोनेरी रंगाचा होताच त्यामधून सुगंध यायला सुरुवात होईल, त्यावेळी मटर, काजू आणि बारीक कापलेली कोथिंबीर घाला. त्यानंतर स्लो फ्लेमवर दोन मिनिटापर्यंत शिजवा. मटर शिजल्यानंतर मटर शिजल्यानंतर त्यामध्ये बासमती तांदूळ टाका. सर्व मिश्रव व्यवस्थित ढवळून घ्या. त्यानंतर मसालेदार भाजीसोबत गरम गरम सर्व्ह करा.