esakal | परफेक्ट चीज ऑम्लेट कसे बनवाल? जाणून घ्या रेसिपी
sakal

बोलून बातमी शोधा

परफेक्ट चीज ऑम्लेट कसे बनवाल? जाणून घ्या रेसिपी

परफेक्ट चीज ऑम्लेट कसे बनवाल? जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तुमच्याजवळ किचनमध्ये अशी बरीच सामग्री असू शकते ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते की यापासून एक वेगळा पदार्थ तयार होऊ शकतो. परंतु तुमची नजर अंड्यावर गेली तर तुम्ही त्यापासून बरेच पदार्थ बनवू शकता हे लक्षात येते. अंड्यामध्ये प्रोटीन असतात तसेच अनेक जैव स्त्रोत उपलब्ध असतात. मांसपेशी, वजन, केस, त्वचेच्या उत्तमतेसाठी अंड्याचे सेवन केले जाते. यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहता. ऑम्लेट, अंडा बुर्जीला ब्रेकफास्टसाठी पसंती दिली जाते. यामध्ये असणाऱ्या चीज ऑम्लेटला अनेक लोक पसंती देतात. पोटभर ब्रेकफास्ट म्हणून याकडे पाहिले जाते. तुमचा ब्रेकफास्ट जर तुम्हाला अधिक स्वादिष्ट बनवायचा असेल चीज ऑम्लेटची रेसिपी ट्राय कराच..

साहित्य -

  • 2 अंडे

  • मीठ

  • हिरवी मिरची

  • 1/4 कप चीज

  • 3 टेबल स्पून तेल किंवा लोणी

कृती -

अंडे आणि मसाले एकत्र फेटून घ्या. पॅनमध्ये तेल किंवा लोणी गरम करा. पॅनमध्ये लोणी वितळ्यानंतर त्यामध्ये तयार अंड्याचे मिश्रण घाला. हे मिश्रण थोडे आत मधून शिजल्यानंतर त्यावर चीज सोडा आणि अंड्याला तुमच्या सोयीनुसार गोल आकार द्या. तयार आहे तुमचे चीज ऑम्लेट. आता हे एका प्लेटमध्ये सर्व्ह करा.

loading image