नाश्तासाठी झटपट बनवा दही उपमा; जाणून घ्या रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाश्तासाठी झटपट बनवा दही उपमा; जाणून घ्या रेसिपी

नाश्तासाठी झटपट बनवा दही उपमा; जाणून घ्या रेसिपी

कोल्हापूर : जेव्हा तूम्ही देसी ब्रेकफास्ट बद्दल विचार करता. तेव्हा सुरुवातीला डोक्यामध्ये एक डीश येते. ती म्हणजे उपमा. (upama) ही एक अशी डिश आहे, जी तुमच्या ब्रेकफास्टसाठी (break fast) नेहमी तुमच्या टेबलवर दिसते. रवा, चणाडाळ किंवा इतर कोणत्याही भाज्या वापरून तुम्ही ही डीश बनवू शकता. उपमा ही एक साउथ इंडियन डीश (south indian dish) आहे. परंतु आज प्रत्येक घरात ही बनवली जाते. साधारणत: तुम्हाला क्लासिक उपमा रेसिपीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. जे याला हेल्दी आणि टेस्टी बनवतात. उदाहरणार्थ, दही उपमा. दही उपमा हे आपल्या पसंतीची डिशमधील एक डिश आहे. यामध्ये थोडे दही मिक्स केल्यानंतर क्लासिक रेसिपी (classic receipe) तयार होते. आणि ही स्वादिष्ट असते. याऐवजी दही हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे तुमचे पोट थंड आणि हलके राहते. यासाठी आपण उन्हाळ्याच्या दिवसात (summer season) किंवा सकाळी नाश्त्याला दही उपम्याचा आनंद घेऊ शकतो. तर आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत..

बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये रवा घ्या आणि तो ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्याच पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, चणा डाळ, उडीद डाळ घालून हे एकत्र भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घाला. सोबतच कापलेले गाजर, हिरवी मिरची हे मिश्रण एकत्र शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये दही घाला आणि भाजलेल्या रवामध्ये मीठ, लाल मिरची पावडर एकत्र करा. आवश्‍यकतेनुसार पाणी घाला आणि झाकण ठेवून बंद करा. यानंतर कोथिंबिरीने गार्निशिंग करा.

loading image
go to top