esakal | पराठा आणि कैरी चटणी; परफेक्ट कॉम्बिनेशनची रेसिपी नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

पराठा आणि कैरी चटणी; परफेक्ट कॉम्बिनेशनची रेसिपी नक्की ट्राय करा
पराठा आणि कैरी चटणी; परफेक्ट कॉम्बिनेशनची रेसिपी नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जर तुम्ही एखाद्या आंब्याच्या झाडाच्या परिसरात मोठे झाला असाल, तर याचा आनंद वेगळा आहे. साधारण भारतीय लोक गरमीमध्ये जास्त चिडचिड करत नाहीत. जगातील इतर लोक या दिवसांत गरमीला पसंती देत नाहीत. मात्र या दिवसात कच्च्या आंब्याची चटणी किंवा यापासून बनवलेले पदार्थ भारतात खाल्ले जातात. अनेक वर्षापासून हे पदार्थ बनवले जातात. या कैरीपासून अनेक प्रकारच्या चटणीही बनवल्या जातात. यापासून बनवलेल्या चटणींना भारतातीय लोकांची अधिक पसंती आहे. पराठे, भात किंवा रोल याच्यांसोबत साईड डिश म्हणून ही उत्तम रेसिपी आहे. जर तुम्ही थोडा हटके विचार करत असाल तर सॅंडविच स्प्रेडसाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.

साहित्य -

  • कैरी 1 किलो

  • 4 कप साखर

  • ¾ कप मीठ

  • ¼ कप लाल मिरची पाउडर

  • 1 टेबल स्पून काळी मिरची पाउडर

  • 2 कडीपत्ता

  • 1 टी स्पून हिंग

  • 1 टेबल स्पून लवंग

कृती -

ही चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला कैरी किसून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात काढून घ्यावी. आणि त्यामध्ये साखर घालून ते एकत्र करावे. या मिश्रणाला सुकण्यासाठी एका सुती कापडामध्ये बांधून ठेवावे. आणि चार दिवसांसाठी उन्हात वाळवून घ्यावे. पुन्हा थोड्या वेळाने हे मिश्रण हलवत राहावे. ऊन पुरेपूर दिल्यानंतर यामध्ये मीठ, मिरची पावडर, पेपर कॉर्न, गरम मसाला घालून हे मिश्रण एकत्र करावे. यातील साखरेचा गोडपणा निघून गेल्यानंतर एका ग्लासमध्ये किंवा बरणीमध्ये हे सुरक्षित बंद करुन ठेवावे. तुम्ही यांना स्टोअरही करू शकता. परंतु हे टाईप बरणीमध्ये ठेवावे लागले. जेणेकरून हवा लागल्याने ते खराब होणार नाही.