रेसिपी : ओल्या काजूगराची उसळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

साधारण फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ओले काजू बाजारात विकण्यास येतात आणि कोकणात तर दारोदारी विकलेही जातात. हापूस आंब्यांप्रमाणे काजूही वर्षातून एकदाच खायला मिळतात. काजूची कच्ची बी काजूच्या (फळाला) बोंडाला खाली लागते, ती सोलून आतील गर काढला जातो, त्याला काजूगर म्हणतात. याच ओल्या काजूगरांची उसळ कशी करायची ते जाणून घ्या.

साहित्य : ३ वाट्या ओले काजूगर, १ वाटी ओले खोबरे, २ कांदे, ५-६ पाकळ्या लसूण, कोथिंबिर, कडीपत्ता, गरम मसाला, काळीमिरी पावडर, फोडणीसाठी २ टेबल स्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ.

कृती -
1) ओले काजू कोमट पाण्यात काही वेळ ठेवावेत. त्याची साले आपोआप निघून जातात. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ती धुवून घ्यावीत.

2) सर्वप्रथम मसाला वाटून घेण्यासाठी एक वाटी ओले (किंवा सुके) खोबरे, २ चिरलेले कांदे, ५-६ पाकळ्या लसूण, गरम मसाला भाजून घ्या आणि मग मिक्सरमध्ये फिरवा. 

3) मसाला तयार झाल्यावर फोडणीची तयारी करावी. त्यासाठी एका कढईत तेल गरम करुन कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिंग, हळद आणि तिखट टाकावे. त्यामध्ये तयार केलेला मसाला, कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकावे. मसाला चांगला परतून झल्यावर काजूगर टाकावेत.

4) आवश्यकतेनुसार पाणी घालून, झाकण ठेवून काजू शिजू द्यावेत.

5) दहा मिनिटांतच काजू शिजतील. त्यानंतर वरुन बारीक चिरलेली कोथिंबिर टाका.

6) चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी काजूची उसळ तयार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recipe Olya Kajugarachi Usal