esakal | रेसिपी : रवा बेसन ढोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

रेसिपी : रवा बेसन ढोकळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य :

एक वाटी बारीक रवा, एक वाटी बेसन, अर्धी वाटी आंबट दही, मीठ, तेल, आले मिरची पेस्ट.

कृती :

बेसन रवा अगदी थोडी हळद, चवीपुरते मीठ व २ चमचे तेल आले मिरची पेस्ट घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात दही घालून हळूहळू हलवावे. गुठळी पडू देऊ नये, नंतर थोडे पाणी टाकून भज्यांच्या पिठापेक्षा जरा सैल भिजवावे. वरच्या साहित्याला साधारण एक वाटी पाणी लागते. सर्व एकत्र करून घ्यावे. इकडे ताटाला किंवा कुकरच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करावे. एका कढईत पाणी उकळायला ठेवून त्यात स्टँड ठेवणे.

वरील साहित्यात एक इनो पॅकेट घालून मस्त फेटावे व कुकरच्या भांड्यात मिश्रण ओतून कढईत ठेवावे. घट्ट झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ मिनिट ठेवावे. गार झाल्यावर फोडणी करून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी टाकलेली फोडणी वरून टाकावी. खोबरे, कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.

loading image
go to top