esakal | रंग आणि स्वाद हवा असेल तर पदार्थात घाला 'हे' सिक्रेट इन्ग्रेडियंट
sakal

बोलून बातमी शोधा

रंग आणि स्वाद हवा असेल तर पदार्थात घाला 'हे' सिक्रेट इन्ग्रेडियंट

रंग आणि स्वाद हवा असेल तर पदार्थात घाला 'हे' सिक्रेट इन्ग्रेडियंट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : स्वयंपाक उत्तम होण्यासाठी वेगवेगळे मसाले आणि इनग्रिडीयंटचा वापर करत असतो. परंतु कितीही या मसाल्यांचा वापर केला तरी हलवाई प्रमाणे आपली भाजी किंवा स्वयंपाक चवीचा होत नाही. (hacks to make dhaba style sabji) त्याचा रंग लाल किंवा तशीच चव येत नाही. काही लोकांना असं वाटतं की यामध्ये लाल रंग मिक्स केला असावा परंतु तशी पद्धत नसते. (sabji hacks) यामध्ये काही सिक्रेट इनग्रिडीयंट घातले जातात. त्यामुळे त्याचे आणि रंग आणि चवीवर इफेक्ट होतो. (hacks for making sabji) आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची रेसिपी स्वादिष्ट आणि हलवाई वाल्यांना प्रमाणेच चविष्ट होईल. (How To Make Halwai Style Sabji)

बीटामुळे येईल रंग

हलवाईने बनवलेली भाजी आणि आपण बनवलेली भाजी याचा रंग वेगळा असतो. काही लोक गोड कलरचा वापर करतात. परंतु तुम्ही रंगासाठी अशाप्रकारे बीटचा वापर करू शकता. कांदा चिरतेवेळी तुम्ही बीट किसून घेऊ शकता. जर चवीमध्ये काही खास फरक जाणवला नाही, किमान रंगामध्ये तरी बदल होऊ शकतो. आणि कांद्यासोबत ही मिक्स केल्याने याचे टेक्सचरही उत्तम होईल.

खडे मसाले वापरायला विसरू नका

हलवाई वाल्यांनी बनवलेल्या भाजीमध्ये खड्या मसाल्यांचा वापर केलेला असतो. आपण घरी असल्यामुळे साधारणत: या गोष्टींनाही नजर अंदाज करतो. अनेक महिला स्वयंपाकात गरम मसाला पावडर अधिक वापरतात. परंतु हालवाई जेवण बनवतावा सर्रास खड्या मसाल्यांचा वापर करतात. हलवाई कोणतीही भाजी बनवताना याचा वापर असतोच. त्यामुळे त्यांची भाजी स्वादिष्ट होते.

हेही वाचा: आर्थिक संकटात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर चिडले 'नट्टू काका'

आमचूरचा स्वाद

हलवाईने बनवलेल्या भाजीचा स्वाद आंबट-गोड असतो. टोमॅटो पेस्टमुळे तसेच आमचूर पावडरमुळे तो स्वाद येतो. कोबी, वांगे यांसारखे भाज्यांमध्ये आमचूर पावडर घातली जाते. त्यामुळे याचा स्वाद आंबट-गोड होतो.

स्वाद हलकासा गोड असतो

हलवाई स्टाईल भाजीमध्ये मसाल्याचे प्रमाण जास्त असते. परंतु यामध्ये हलक्‍या प्रमाणात गोडवा सुद्धा असतो. जर तुम्ही यामध्ये साखर गूळ वापरत असाल तर भाजीची चव बदलते आणि भाजीला आंबट-गोड स्वाद येतो.