आर्थिक संकटात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर चिडले 'नट्टू काका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ghanshyam Nayak

आर्थिक संकटात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर चिडले 'नट्टू काका'

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक Ghanshyam Nayak हे आर्थिक संकटात असल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता खुद्द घनश्याम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे शोमधून ब्रेक घेतला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या मुंबईत शूटिंगला बंदी असल्याने या मालिकेचं शूटिंग काही दिवसांकरिता थांबवलं आहे. (Taarak Mehta Ghanshyam Nayak dismisses rumours of financial crisis)

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घनश्याम यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांनी काही वेळ मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र आता शूटिंग सुरू झाल्यावर पुन्हा काम करणार असल्याचं ते म्हणाले. 'लोकं इतकी नकारात्मकता का पसरवतात हेच मला कळत नाही. मी मालिकेतून ब्रेक घेतलेला नाही. सध्या परिस्थिती अशी आहे की ज्येष्ठ कलाकार महाराष्ट्राबाहेर जाऊनही शूटिंग करू शकत नाहीयेत. आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळतोय आणि आमच्याच आरोग्याचा विचार करून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुंबईत शूटिंगला परवानगी मिळताच मीसुद्धा काम पुन्हा सुरू करेन', असं ते म्हणाले.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ

आर्थिक संकटात असल्याच्या चर्चांवर ते पुढे म्हणाले, 'मी आर्थिक संकटात नाही. माझ्या नातवंडांसोबत मी घरी चांगला वेळ घालवतोय. इतकंच नव्हे तर मी स्वत: गरजूंची मदत करतोय. मी बेरोजगार नाही आणि कोणत्याच आर्थिक संकटातदेखील नाही.'

घनश्याम यांनी इतरही हिंदी आणि गुजराती मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी 'खिचडी' आणि 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकांमध्येही काम केलं होतं.