आजची रेसिपी : लवंग लतिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

हा बंगाली पदार्थ आहे. जसे बंगाली रसगुल्ले प्रसिद्ध आहेत, तसेच लवंग लतिका हादेखील बंगाली लोकांचा आवडता पदार्थ आहे. 

हा बंगाली पदार्थ आहे. जसे बंगाली रसगुल्ले प्रसिद्ध आहेत, तसेच लवंग लतिका हादेखील बंगाली लोकांचा आवडता पदार्थ आहे. 

तयार होण्यासाठीचा वेळ : ६० मिनिटे

पारीसाठी साहित्य : २ कप मैदा, २ टे. स्पून रवा, १ टे. स्पून तूप (मोहन), चिमूटभर खायचा सोडा, १ टी स्पून साखर. 

सारणाचे साहित्य : १ कप खवा, १ टे. स्पून रवा, २ टे. स्पून पिठीसाखर, १ टी स्पून वेलचीपूड, २ टे स्पून काजू-बदाम (जाडसर पावडर).

साखरेच्या पाकासाठी : २ कप साखर, १ कप पाणी, केसर किंवा केशरी रंग, तळण्यासाठी तूप आणि २०-२५ लवंगा.

कृती : मैद्यामध्ये सोडा, १ टी स्पून साखर आणि कडकडीत मोहन टाकून पाण्याने घट्ट पीठ मळून घ्यावे. कढईमध्ये रवा, खवा भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर वेलची पूड, काजू-बदाम पावडर घालून मिश्रण करून सारण तयार करावे. साखर व पाणी एकत्र करून थोडा घट्टसर पाक करून घ्यावा. त्यामध्ये केसर किंवा केशरी रंग घालावा. पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून एक टे. स्पून सारण भरून घट्ट वळकुटी करून वेटोळा घाला आणि त्यावर एक लवंग खोचा. अशा सर्व लवंग लतिका बनवून घ्याव्यात. कढईमध्ये तूप गरम करून लवंग लतिका मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्याव्यात. नंतर पाकामध्ये दोन-तीन मिनिटे बुडवून ठेवाव्यात. नंतर एका ताटात काढून थंड झाल्यावर सर्व्ह कराव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recipes Lavang Latika