esakal | माझी रेसिपी : आंब्याची डाळ
sakal

बोलून बातमी शोधा

Mango-Dal

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असतो आणि तिथूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. शिवाय इथूनच मराठी सण सुरू होतात. चैत्र महिन्यात रामनवमी, हनुमान जयंती असे अनेक सण असतात. शिवाय याच महिन्यात चैत्र-गौरी नावाचं हळदी कुंकू करतात. चैत्र-गौरीची आरास महिला सुंदरपणे करतात. या हळदी-कुंकूचं आणखी एक महत्त्व म्हणजे याच काळात आंब्याची डाळ आणि पन्हं घरोघरी करतात आणि इतरांनाही देतात. उन्हाळी स्पेशल आब्यांच्या डाळीची रेसिपी जाणून घेऊयात.

माझी रेसिपी : आंब्याची डाळ

sakal_logo
By
ऋतुजा कदम

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असतो आणि तिथूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. शिवाय इथूनच मराठी सण सुरू होतात. चैत्र महिन्यात रामनवमी, हनुमान जयंती असे अनेक सण असतात. शिवाय याच महिन्यात चैत्र-गौरी नावाचं हळदी कुंकू करतात. चैत्र-गौरीची आरास महिला सुंदरपणे करतात. या हळदी-कुंकूचं आणखी एक महत्त्व म्हणजे याच काळात आंब्याची डाळ आणि पन्हं घरोघरी करतात आणि इतरांनाही देतात. उन्हाळी स्पेशल आब्यांच्या डाळीची रेसिपी जाणून घेऊयात.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साहित्य - अर्धा कप चणाडाळ, एक हिरवी मिरची, आलं, मीठ, कैरी, १ चमचा तेल, १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, हिंग, कडुनिंब, हळद, कोथिंबीर

कृती - अर्धा कप चणाडाळ तीन तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाकावे आणि डाळ मिक्सरच्या भाड्यांत काढून घ्यावी. या डाळीत एका हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे आणि चवीपुरते मीठ घालून मिक्सरला लावा. ही पेस्ट जास्त बारीक करू नये. वाटलेल्या डाळीमध्ये किसलेली एक कैरी घालावी. (साल काढून कैरी किसून घ्यावी). डाळीमध्ये पाणी घालू नये. त्यामुळे चव कमी होण्याची शक्यता असते. 

एक कप डाळीसाठी साधारण अर्धा कप कैरी घ्यावी. बारीक केलेली डाळ आणि कैरीचं हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता फोडणी तयार करण्यासाठी एक चमचा गरम तेलामध्ये एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे, चिमूटभर हिंग, हळद आणि कडीपत्ता घालावा. ही फोडणी डाळ आणि कैरीच्या मिश्रणात घालावी. शेवटी बारीक केलेली कोथिंबीर वरून घालावी.