esakal | रेसिपी : मक्याचे कटलेट
sakal

बोलून बातमी शोधा

corn cutlet

रेसिपी : मक्याचे कटलेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : मक्याची ४ कणसे, २ चमचे तेल

मिश्रणासाठी साहित्य : बारीक चिरलेला १ मोठा कांदा, अर्धा चमचा धणे-जिरे पूड, पाव चमचा गरम मसाला पूड, १ चमचा मीठ, बारीक चिरलेल्या ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा अखंड जिरे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग मक्याचे कणीस सोलून काढलेले दाणे कुकरमध्ये ४ शिट्या देऊन वाफवून घ्यावेत. गार झाल्यावर हे दाणे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घ्यावेत.

वर नमूद केलेले मिश्रणाचे सर्व साहित्य घालून हा बारीक वाफवलेला मका चांगला मळून घ्यावा. हाताला हलके तेल लावून या मिश्रणाचे बदामी किंवा आवडत्या आकारात कटलेट बनवावेत. नॉन-स्टिक पॅनमध्ये २ चमचे तेल घालून कटलेट खरपूस भाजून घ्यावेत. नारळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत कटलेटचा आस्वाद घ्यावा.

loading image
go to top