esakal | Recipe: पौष्टिक सातूचे लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

सातूचे लाडू

रेसिपी : पौष्टिक सातूचे लाडू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : सातूचे पीठ (गहू भाजून घेऊन त्यात डाळी व थोडे जिरे असे एकत्रित दळून तयार होणारे पीठ म्हणजे सातू), गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स, वेलदोडा पूड.

कृती : सातूचे पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे. ते गार करून घ्यावे. गूळ किसून घेऊन भाजलेल्या पिठात घालावा. त्यात ड्रायफ्रूट्स घालावेत. वेलदोडा पूड घालावी. मुलं ड्रायफ्रूट्स खाण्याचा कंटाळा करतात, म्हणून मिक्सरला फिरवून ती पिठात मिक्स करावी. तयार पीठात तूप आवश्यकतेनुसार गरम करून टाकावेत व मुलांना आवडतील तसे लाडू बनवावे.

झटपट होणारे हे सातूच्या पिठाचे लाडू चवीला छान लागतात. गुळामुळे छान टेस्ट येते. गुळाऐवजी पिठीसाखर वापरली तरी चालते.

loading image
go to top