
Sakal
शारदीय नवरात्रीच्या उपवासात अनेक लोक करतात.
सकाळी नाश्त्यासाठी १० मिनिटांत तयार होणारी रेसिपी सांगणार आहोत.
जी तुम्ही सहज तयार करू शकता.
आजपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या उपवासात सात्विक आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. सकाळी नाश्त्यासाठी वेळ कमी असला, तरी तब्येतीला पोषक आणि चविष्ट पर्याय निवडणे गरजेचे आहे. जर तुम्ही नवरात्रीचा उपवास करत असाल, तर ड्रायफ्रुट स्मुदी हा एक उत्तम पर्याय आहे. ही स्मुदी १० मिनिटांत तयार होते. ही स्मूदी प्रथिने, फायबर आणि नैसर्गिक साखर यांनी युक्त आहे. उपवासात थकवा जाणवत असेल, तर ही स्मुदी तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. जाणून घेऊया नवरात्रीच्या उपवासासाठी ही हेल्दी ड्रायफ्रुट स्मुदी कशी बनवायची आणि साहित्य काय लागते.