हेल्दी फूड : फॅड डाएट आणि जीवनशैलीतील बदल...

शौमा मेनन
Tuesday, 19 January 2021

आपण सुरुवातीला फिट असणे, सुदृढ असणे, छान वाटणे आणि आजारविरहित राहणे म्हणजे नक्की काय, हे पाहू. ‘फिटनेस इज लाइफस्टाइल’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असणार, याची मला खात्री आहे. फिटनेस ही एखादा प्रसंग, ऋतू किंवा महामारी आल्यानंतर विचार करण्याची, प्रेरणा घेण्याची गोष्ट नक्कीच नाही. तो आयुष्य जगण्याचा मार्ग असला पाहिजे...

या लेखाचे शीर्षकच अनेकांना आश्‍चर्यकारक वाटेल... याचे कारण आपला असा विश्वास असतो, की आपण घेत असलेले फॅड डाएट शाश्वत आहे...

आपण सुरुवातीला फिट असणे, सुदृढ असणे, छान वाटणे आणि आजारविरहित राहणे म्हणजे नक्की काय, हे पाहू. ‘फिटनेस इज लाइफस्टाइल’ हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असणार, याची मला खात्री आहे. फिटनेस ही एखादा प्रसंग, ऋतू किंवा महामारी आल्यानंतर विचार करण्याची, प्रेरणा घेण्याची गोष्ट नक्कीच नाही. तो आयुष्य जगण्याचा मार्ग असला पाहिजे...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुम्हाला सुदृढ आणि आजारविरहित राहायचे आहे का? मग, तुमच्या शरीरावर एक मेहेरबानी करा आणि त्याचे योग्य अन्नघटकांची निवड करून पोषण करा. यामध्ये तुम्हाला चांगले दिसणे हा घटकही जोडायचा आहे का? तसे केल्यास तुम्हाला हवी असलेली फॅशन तुम्ही कायमच करू शकाल. हे घडण्यामागचे रहस्य आहे सातत्य...तुम्हाला एखादे आव्हान मिळाल्यास आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळत असल्यास एखादा दिनक्रम सातत्यपूर्ण बनतो. त्यामुळे तुम्हाला आवडणारे ठिकाण शोधा आणि आवडणारा दिनक्रम पुनःपुन्हा करून अधिक उत्तम बना..

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

योग्य खाणे हा तुम्हाला दिवसभरात कसे वाटते यामागचा महत्त्वाचा भाग आहे. तुमचे अन्न तुमचा मूड तयार करते किंवा तुमचे काय खावे हे तुमचा मूड ठरवतो...यातून कंफर्ट फूड या शब्दाचा जन्म झाला आहे...     

आता आपण फॅड डाएटबद्दल बोलू
फॅड म्हणजे अशी गोष्ट, जी तुमच्याबरोबर फार काळासाठी राहत नाही. ती तुमच्या आयुष्यात शिरकाव करते, तुमच्या फायद्याची ठरते वा ठरतही नाही...त्यामुळे ‘फॅड’ जीवनपद्धती कशी काय बनू शकेल? आपल्याला केटो, पालिओ, एलसीएचएफ, बनाना अशा अनेक डाएटबद्दलची माहिती असेल. या प्रकारांमुळे मानवी मेंदू पुरता गोंधळून जातो. आपले अन्नाबरोबरचे नाते असे गुंतागुंतीचे का बरे करावे? आपल्याला कायमस्वरूपी आरोग्यपूर्ण राहावेसे आणि जबरदस्त आकर्षक दिसावे वाटत नाही का? तुमचे ‘फॅड डाएट’ तुमच्यासाठी योग्य ठरत असल्यास ते तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. जीवनशैलीसाठीचे योग्य अन्न काय असावे, याची काही निकष खाली दिले आहेत.

  • तुमचे अन्न तुम्हाला आनंदी बनवते. याचा अर्थ तुम्ही दररोज जंक फूड खावे असा नसून, तुमचे पोषण करणाऱ्या अन्नाचा तुम्हाला कंटाळा येऊ नये, असा आहे.
  • तुम्ही खात असलेल्या अन्नामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढायला हवी. अन्न तुम्हाला आळशी, जड, झोपाळू वाटावे म्हणून नसते. तुम्ही घेतलेले अन्न असे करीत असल्यास तुम्ही खात असलेले अन्न तातडीने बदलण्याची गरज आहे. 
  • समतोल हाच मंत्र आहे. आपण जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. पुढचे ‘चीट मिल’ घेण्यासाठी तुम्ही करीत असलेल्या सर्व गोष्टी आधी थांबवा. हे कधीतरी करायला हरकत नाही, मात्र लगेचच तुम्ही तुमच्या मूळ जीवनशैलीकडे परत येणे आवश्यक आहे. 
  • व्यायाम ही आठवड्यातून तुम्हाला वाटते त्या एक-दोन दिवशी करण्याची गोष्ट नाही. तुम्हाला छान वाटावे आणि दिसावे असे वाटत असल्यास दररोज एक तास स्वतःसाठी द्या, दररोज व्यायाम करा. 
  • तुमच्या शरीराला आवश्यक अन्नघटक मिळविण्यासाठी मायक्रो किंवा मॅक्रो न्यूट्रियंट्सच्या गोळ्या अजिबात घेऊ नका. तुम्ही घेत असलेले नैसर्गिक अन्नघटक तुमची पौष्टिक घटकांची गरज पूर्ण करीत नसल्यास न्यूट्रिनिशिस्टशी बोलून तुमचा रोजच्या जेवणाचा प्लॅन बदलून घ्या. अन्यथा फॅड डाएटमुळे याआधी झालेले शरीराचे नुकसान पुन्हा होऊन तुमच्यावर डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ शकते...

(लेखिका ‘किलोबीटर’ या हेल्थ फूडविषयक स्टार्टअपच्या संस्थापिका आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shauma memon writes about healthy food