हेल्दी रेसिपी : कुळीथाच्या शेंगोळ्या 

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 28 July 2020

आपण मागील लेखात कुळीथाच्या माडग्याची रेसिपी जाणून घेतली होती. या लेखानंतर अनेक वाचकांच्या उत्तम प्रतिक्रिया आल्या. काहीजणांच्या विनंतीनुसार कुळीथाच्या अन्य काही खास रेसिपी पाहूयात. 

आपण मागील लेखात कुळीथाच्या माडग्याची रेसिपी जाणून घेतली होती. या लेखानंतर अनेक वाचकांच्या उत्तम प्रतिक्रिया आल्या. काहीजणांच्या विनंतीनुसार कुळीथाच्या अन्य काही खास रेसिपी पाहूयात. 

प्रकार - १ 
साहित्य - कुळीथ पीठ, मीठ, लसूण-मिरची-जिरे वाटण, पाणी, तेल, जिरे, लसूण, कडीपत्ता, तिखट, मीठ (फोडणीसाठी) 

कृती – 
१. वाटण व मीठ घालून पीठ मळून घेणे. 
२. पिठाचा छोटा गोळा घेऊन जिलेबीप्रमाणे आकार देणे. 
३. पाण्याला फोडणी देऊन तयार शेंगोळ्या या पाण्यात घालून शिजविणे. 
टीप – नुसतेच किंवा भात/भाकरीसोबत खाणे. 

प्रकार – २ 

साहित्य – वरीलप्रमाणे. 

कृती – 
१. वरीलप्रमाणे शेंगोळे बनवून तेल घातलेल्या पाण्यात शिजवून घेणे. (शेंगोळ्या एकमेकांना न चिकटण्यासाठी तेल आवश्यक). 
२. पाण्यातून शेंगोळ्या बाजूला काढून निथळून घेणे व फोडणी करून त्यात परतून घेणे. 

टीप- 
१. तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी म्हणून रुचकर लागतात. 
२. बाजूला काढलेल्या पाण्याचा वापर कढण करण्यासाठी करता येईल. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

कुळीथाची पिठी 
कोकणात घरोघरी हमखास होणारा एक साधा, सोपा आणि पौष्टिक पदार्थ. मुसळधार पावसात भिजल्यानंतर गरमागरम भात, पिठी आणि लोणचं म्हणजे पर्वणीच जणू! 

साहित्य – कुळीथाचे पीठ, किसलेले ओले खोबरे, आमसूल, कोथिंबीर. फोडणी - कडीपत्ता, हिंग, कांदा, मिरची, लसूण, जिरे, हळद. 
कृती – 
१. साधारण चमचाभर पीठ पाण्यात कालवून घेणे. 
२. फोडणी करून पाणी घालून उकळी आणणे. 
३. कालवलेले पीठ हळूहळू आधणात सोडणे. 
४. आमसूल व खोबरे घालून उकळून घेणे. 
५. वरून कोथिंबीर घालणे. 

कढण 
साहित्य – कुळीथ, तेल, लसूण, जिरे, मिरची किंवा लाल तिखट, मीठ 

कृती – 
१. कुळीथ भाजून शिजविणे व गाळून घेणे. 
२. यातील थोडेच कुळीथ वाटणे. 
३. फोडणी करून कुळीथ शिजवलेले पाणी, मिरची किंवा तिखट, मीठ, वाटलेले कुळीथ घालून चांगले उकळून घेणे. 
टीप – 
१. अन्य काही प्रकारांमध्ये कुळीथाऐवजी कुळीथ पिठाचा वापर करतात. तर काही प्रकरांत खाताना नारळाचे दूध किंवा ताक वरून घेतात. 
२. हे कढण आजारपणात तसेच थंडीच्या काळात रात्रीच्या जेवणात सूप म्हणून घेता येईल. 
३. बाजूला काढलेल्या कुळीथापासून नेहमीप्रमाणे उसळ करता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa parandekar article healthy-recipe

Tags
टॉपिकस
Topic Tags: