हेल्दी रेसिपी : कळणा - दुधी भोपळ्याचे पौष्टिक फुनके 

शिल्पा परांडेकर
Tuesday, 22 September 2020

तूर किंवा हरभरा किंवा दोन्ही डाळींच्या एकत्रित कळण्यापासून फुनके बनविले जातात. आपण आज पारंपरिक फुनके ‘दुधी भोपळा’ हा आणखी एक पौष्टिक घटक घालून बनविणार आहोत. 

‘कळणा’ म्हणजे डाळ करून झाल्यावर उरलेला डाळीचा बारीक भाग. पूर्वी डाळी घरीच जात्यावर भरडल्या जायच्या व डाळीच्या प्रत्येक अंगाचा वापर आहारात होत असे. डाळ, कळणा आणि शेवटचा भाग म्हणजे कणोरा (कळण्यापेक्षाही बारीक कण) असे तीन प्रकार मिळतात. कळणा किंवा कणोऱ्याचा उपयोग फुनके, शेंगोळ्या, मुटके, झुणका/बेसन तसेच काही ठिकाणी भाज्यांमध्ये पेरून मोकळी भाजी करण्यासाठीही केला जात असे. सध्या जात्यांचा वापर कमी होत असल्याने कळणा व कणोराचा आहारातील वापर कमी झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी आपण कोकण भागातील कळण्याची एक रेसिपी पहिली होती. त्याच्याशी साधारण साधर्म्य असणारा आजचा पदार्थ. (मात्र मराठवाड्यातील कळण्याची भाकरी या दोन्हींपेक्षा वेगळी. त्याची रेसिपी पुढील लेखात.) 

फुनके हा महाराष्ट्रातील विदर्भ व खानदेश प्रांतातील एक पारंपारिक व पौष्टिक पदार्थ. तूर किंवा हरभरा किंवा दोन्ही डाळींच्या एकत्रित कळण्यापासून फुनके बनविले जातात. आपण आज पारंपरिक फुनके ‘दुधी भोपळा’ हा आणखी एक पौष्टिक घटक घालून बनविणार आहोत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथिने, खनिजे, फायबर व अँटिऑक्सिडंटनी युक्त तुरीची डाळ अॅनिमिया, रक्तदाब, जळजळ, सूज येणे अशा त्रासांवर फायदेशीर असते. 

लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘ब’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ यांनी युक्त दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. हृदयरोग, मधुमेह, उष्णतेचे आजार, वजन घटविणे अशा समस्यांवर लाभदायक आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

साहित्य - दुधी भोपळ्याचा किस, तुरीचा कळणा किंवा तूर डाळीची भरड, आलं-लसूण-मिरची-जिरे वाटण, मीठ, कोथिंबीर, हळद, धने पूड, गरम मसाला, लिंबू रस, बेसन/ज्वारी पीठ. (बाइंडिंग पुरते आवश्यक असल्यास). 

फोडणी - तेल, जिरे, मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्ता, किंचित साखर, लाल तिखट, हळद. कोथिंबीर, लिंबू रस, चाट मसाला (ऐच्छिक). 

कृती  
१. कळणा ४-५ तास भिजवून घेणे. 
२. भोपळ्याचा किस व उर्वरित साहित्य घालून मुटके वळणे व चाळणीवर वाफवून घेणे. 
३. थंड झाल्यावर कापून व थोडा चुरा करून घेणे. 
४. फोडणी करून फुनके परतवून घेणे. 
५. वरून लिंबू रस व कोथिंबीर घालून सर्व्ह करणे. 

टीप - कढी, चटणीसोबत हे फुनके छान लागतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa parandekar writes article about Healthy recipe milk gourd