Shravan Somvar Recipe: उपवासाचे रगडा पॅटीस कसे तयार करायचे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shravan Somvar Ragda Pattice Recipe

Shravan Somvar Recipe: उपवासाचे रगडा पॅटीस कसे तयार करायचे?

श्रावण महिना सुरू झाला. हा श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो. भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते, उपवास केला जातो. या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय.

उपवासाचे रगडा पॅटीस कसे तयार करायचे ?

हेही वाचा: Shravan 2022: सोमवारच्या उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करायची ?

साहित्य:

1) एक वाटी शेंगदाणे

2) दोन उकडलेले बटाटे

3) एक मोठा चमचा साजूक तूप

4) जिरे

5) ओले खोबरे

6) मिरची पेस्ट

7) आमसूल

8) मीठ

9) गूळ

10) तिखट

कृती:

सर्वप्रथम शेंगदाणे दोन तास पाण्यात भिजू घालावे.दोन तासानंतर ते शेंगदाणे उपसून त्याला कुकरमध्ये टाकुन 5 शिट्ट्या होऊ द्याव्या.

शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.नंतर कढईत तूप तापवून त्यात जिरे, खोबरे, उकडलेले बटाट, मिरची पेस्ट आणि मीठ, दाण्याचे कूट घालून नीट हे मिश्रण चांगल कलसून घ्यावे.

नंतर या मिश्रणाचे पॅटीस तयार करावे आणि ते तव्यावर तेल किंवा तूप टाकून निट शेकून घ्यावे.

शिल्लक राहिलेल्या शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये थोडेसे पाणी घालून त्यात आमसूल, मीठ, गूळ आणि वरून जिऱ्याची तूपाची फोडणी घालून रगडा तयार करून घ्या.

पॅटीसवर हा रगडा आणि तुम्हाला हवं असल्यास, चिंचगूळाची चटणी आणि हिरवी चटणी घालून या रगडा पॅटीसची चव अधिक चांगली लागेल.

Web Title: Shravan Somvar Ragda Pattice Recipe How To Prepare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top