
थोडक्यात:
श्रावण महिन्यात उपवासांना धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून त्यासाठी खास पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
उपवासासाठी नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असल्यास, केळं, बटाटा आणि साबुदाण्यापासून तयार केलेलं क्रिस्पी कटलेट एक हटके पर्याय आहे.
ही रेसिपी चविष्ट, पोटभरीची आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते.
Best Easy-to-Make Shravan Upvas Recipes: श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हा सण, उपवास आणि व्रतवैकल्याचा खास महिना आहे. या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण-समारंभ साजरे केले जातात. तसेच या महिन्यात केलेल्या उपवासांना देखील विशेष महत्त्व आहे.
या उपवासांना खास पदार्थही बनवले जातात. पण नेहमी तेच उपवासाचे खाऊन कंटाळा येतो तुम्हाला यंदा उपासासाठी काही हटके आणि वेगळं ट्राय करायचं असेल तर पुढे दिलेली क्रिस्पी आणि टेस्टी उपवास कटलेट्सची रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता. ही दिसायलाही आकर्षक, खायलाही खमंग आणि पोटासाठी हलकी आहे! केळं, बटाटा, साबुदाणा आणि कोथिंबिरीच्या पेस्टचं हे भन्नाट कॉम्बिनेशन तुमचा उपवास खास नक्की करेल!
2 कच्ची केळी
1 मध्यम बटाटा उकडलेला
1/2 कप साबुदाणा
1 टेस्पून उपासाची भाजणी
1 टेस्पून शेंगदाण्याचा कूट
4 हिरव्या मिरच्या + 1/2 टिस्पून जिरे + 1/2 कप कोथिंबीरची पेस्ट
1 टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
तूप किंवा शेंगदाणा तेल, तळण्यासाठी
साबुदाणा धुवून त्यातील पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून 1 तास झाकून ठेवावा.
साबुदाणा नीट भिजला की, केळे सोलून किसून घ्यावे. नंतर साबुदाणा, किसलेली केळी, उकडून कुस्करलेला बटाटा, उपासाची भाजणी, शेंगदाणा कूट, मिरचीपेस्ट, लिंबू रस, आणि मीठ एकत्र करावे. नीट मळून गोळा तयार करावा. हा गोळा समान विभागून मध्यम आकाराचे कटलेट बनवावे. आवडीप्रमाणे आकार द्यावा.
तेल किंवा तूप गरम करावे. तयार कटलेट मध्यम आचेवर तळून घ्यावे.
गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
उपवासाच्या दिवशी हे कटलेट खाण्यास योग्य आहे का? (Is this cutlet suitable for fasting days?)
होय, ही रेसिपी पूर्णपणे उपवासासाठी योग्य आहे. यात उपासाचेच साहित्य जसे की साबुदाणा, कच्ची केळी, बटाटा, उपासाची भाजणी आणि शेंगदाण्याचा कूट वापरलेले आहेत.
या रेसिपीत उपासाची भाजणी ऐवजी दुसरा पर्याय वापरू शकतो का? (Can I substitute Upwas Bhajani with something else in this recipe?)
जर भाजणी नसेल तर ती स्कीप करून थोडी अधिक शेंगदाण्याचा कूट किंवा राजगिरा पीठ वापरू शकता. यामुळे गोळा बांधेसूद राहतो आणि चवही चांगली येते.
कटलेट तळण्याऐवजी बेक किंवा एअर फ्राय करता येईल का? (Can the cutlets be baked or air-fried instead of deep-fried?)
होय, कटलेट एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये बेक करूनही बनवता येतील. मात्र त्यासाठी वरून थोडं तूप ब्रश केल्यास अधिक कुरकुरीत होतील.
हे कटलेट बनवून फ्रीजमध्ये साठवता येईल का? (Can these cutlets be made in advance and stored in the fridge?)
हो, हे कटलेट्स मिक्स करून आकार देऊन फ्रीजमध्ये 1 दिवसासाठी ठेवता येतात. तळायच्या आधी थोडा वेळ बाहेर काढून मग तळावं, म्हणजे चव आणि टेक्सचर चांगलं टिकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.