esakal | श्रावण विशेष : पारंपारिक भिरडी
sakal

बोलून बातमी शोधा

recipe

श्रावण विशेष : पारंपारिक भिरडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी गूळ, अर्धी वाटी पाणी, १ चमचा वेलची पावडर, १ चमचा जायफळ पावडर, १ चमचा तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप

कृती : प्रथम गॅसवर मध्यम आचेवर पाणी गरम करून घ्या. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, तूप, गूळ घाला. व्यवस्थित एकजीव करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर, नंतर तांदळाचे पीठ घाला. व्यवस्थित एकत्रित करून सात ते आठ मिनिटे पीठ छान शिजू द्या. गॅस बंद करा आणि झाकण ठेवून दहा मिनिटं पीठ वाफवून घ्या. नंतर पीठ हाताने छान मळून घ्या.

हेही वाचा: श्रावण विशेष : सँडविच ढोकळा

आता भिरडी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे हातावर घेऊन आपण शेंगोळ्याप्रमाणे बनवून घ्या. तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तयार केलेली भिरडी छान सोनेरी रंगांमध्ये तळून घ्या. अशी गोड भिरडी खूप छान लागतात झटपट होतात नैवेद्यासाठी उत्तम आहेत.

- सुवर्णा पोतदार, पुणे

loading image
go to top