Foodgrains ना किडे लागताहेत, मग या टिप्सच्या मदतीने धान्य करा स्टोअर वर्षभराची मिटेल चिंता

अनेकजण तीन महिन्याचं किंवा वर्षाचं धान्य एकदाच खरेदी करतात. हे धान्य किडीपासून वाचवायचं कसं याच्या या टिप्स
धान्य ठेवा सुरक्षित
धान्य ठेवा सुरक्षितEsakal

अनेकजण वेळोवेळी बाजारात जाऊन धान्य किंवा डाळी आणण्याएवजी वर्षभराचं धान्य किंवा ३-४ महिन्यांसाठी कडधान्य आणि डाळींची Pulses खरेदी करत असतात. खास करून पावसाळ्यामध्ये प्रत्येकवेळी बाजारात जाऊन धान्य Food Grains खरेदी करणं शक्य होत नाही. Smart Marathi Tips to Store Foodgrains and Pulses keeping away pests

यासाठीच अनेकजण किमान ३ चार महिन्याचा किराणा Grocery एकदाच भरतात. ३-४ महिन्यांचं धान्य Foodgrains आणि डाळी एकदाच खरेदी केल्याने वारंवार बाजारात जाण्याची गरज भासत नाही शिवाय बऱ्याचदा ते खिशाला परवडणार असतं.

असं असलं तरी हे धान्य साठवण्याची Storage मात्र मोठी चिंता असते. कारणं अनेकदा धान्याला, कडधान्यांना किंवा डाळींना किडे किंवा पाखरं लागण्याची शक्यता असते.

अलिकडे बाजारात Market विविध प्रकारचे एअर टाइट कंटेनर म्हणजेच हवाबंद डबे मिळतात. यातील काही डबे तर अत्यंत महागडे असतात. शिवाय अनेकदा हे महागडे डबे घेऊनही धान्याला किड लागते किंवा पाखरं कडधान्य किंवा डाळी पोखरून त्याचा पूर्ण भुगा करून टाकतात. या किंड्याच्या समस्येपासून धान्य वाचवून ठेवायंच असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय नक्कीच करू शकता.

१. कडूलिंबाच्या पानांचा उपयोग- कडूलिंबाच्या Neem पानांच्या उग्र वासामुळे धान्याला किडे लागणार नाहीत. यासाठी कडूलिंबाची पानं एका सुती कापडात बांधावी. पानं अगदी कमी घेऊ नयेत. त्यानंतर कडूलिंबाच्या पानांची ही पोटली धान्याच्या डब्यात ठेवावी.

जर धान्य जास्त असेल तर ही पोटली धान्याच्या वर न ठेवता धान्याच्या आत खोचून ठेवावी. तुम्ही अशा दोन पोटल्या देखील वापरू शकता. यामुळे तांदूळ, ज्वारी किंवा डाळींना किड लागणार नाही.

हे देखिल वाचा-

धान्य ठेवा सुरक्षित
Health News : भरड धान्य खा, अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!

२. लवंग- लवंगचा वापर करून तुम्ही धान्यातील किड किंवा कडधान्यांमधील पाखरं दूर करू शकता. यासाठी धान्यांच्या डब्यामध्ये काही लवंगा टाकून ठेवा. यामुळे पाखरं किंवा किडे तसचं मुंग्या येणार नाहीत.

धान्य घेताना या लवंगा तुम्ही काढून घेऊ शकता. त्या पुन्हा धान्यांच्या डब्यात किंवा स्वयंपाकासाठी तुम्ही वापरू शकता.

३. लाल मिरची- अनेकदा खासकरून पावसाळ्यामध्य पीठामध्ये किडे होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी पिठामध्ये अख्ख्या २-३ लाल मिरच्या ठेवाव्यात. यामुळे पीठामध्य किडे होणार नाहीत. तसचं दळणासाठी तुम्ही किराणामध्ये गहू भरत असाल तर गव्हामध्ये तुम्ही मिठाचे खडे ठेवू शकता. खड्याचं मीठ एका कापडात बांधून छोट्या छोट्या पुरचुंड्या गव्हामध्ये वर खाली ठेवाव्यात.

४. तेजपत्ता- जेवणाचा स्वाद वाढवणारा तेजपत्ता धान्यातील किडे दूर करण्यासाठी उपयोगात येईल. तुम्ही धान्यांच्या किंवा डाळींच्या डब्यामध्ये ताज्या तेजपत्त्याची १-२ पानं ठेवू शकता.

५. कडीपत्ता- पावसाळ्यात गव्हाच्या किंवा ज्वारी आणि इतर पिठांमध्ये किडे होण्याची शक्यता असते. यासाठी पिठाच्या डब्यात कडीपत्त्याची Curry Leaves काही पानं ठेवल्याने ही समस्या दूर होईल.

६. मोहरीचं तेल- अनेकदा डाळींना पाखरं कुरतडून डाळींचा भुगा करतात. यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर तुम्ही करू शकता. १ किलो डाळीमध्ये १-२ चमचे मोहरीचं तेल लावून डाळ चांगली मिक्स करावी जेणे करून मोहरीचं तेल संपूर्णपणे डाळीला लागेल. त्यानंतर ही डाळ हवाबंद डब्यात भरून ठेवावी. यामुळे डाळ जास्त दिवस टिकेल.

७. माचिसच्या काड्या- हा उपाय जरी काहीसा विचित्र वाटतं असला तरी यामुळे धान्य आणि डाळींमध्ये किड लागणार नाही. काड्यापेट्यांच्या काड्यांमध्ये सल्फर असल्याने किडे आणि पाखरं यापासून दूर पळतात. यासाठी धान्य किंवा डाळीच्या डब्यांमध्ये माचिस बॉक्स ठेवावा. बॉक्समध्ये ८-१० काड्या असाव्या आणि हा बॉक्स अर्धा उघडा ठेवावा.

८. फ्रिजचा वापर- अनेकदा धणे, जीरं पावडरलाही किडे लागतात. यासाठी तुम्ही फ्रिजचा वापर करू शकता. तसचं गरम मसाले किंवा इतर विविध मसाले तुम्ही डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवू शकता.

अशाप्रकारे काही ट्रिकच्या मदतीने तुम्ही घरातील धान्य, डाळी आणि कडधान्ये सुरक्षितपणे काही महिन्यांसाठी स्टोअर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com