
आंबे खाऊन कंटाळलाय? आता खा 'आंब्याची इडली'! जाणून घ्या रेसिपी
Mango Food: आंबे, रस खाऊन कंटाळला असाल तर "आंबा सांदण" हा एक अनोखा कोकणी पदार्थ नक्की करुन बघा. दिसायला भारी दिसतो अन खायला तर अप्रतिम लागतो. आंबा सांदण म्हणायला जरा कठिण वाटतं असेल तर तुम्ही सोप्या भाषेत आंब्याची ईडली देखील म्हणू शकता.
आंबा सांदण करता लागणारे साहित्य:
1) एक वाटी इडली रवा (थोडा भाजलेला)
2) दीड वाटी आंब्याचा रस
3) अर्धी वाटी दूध
4) साखर (आवडीनुसार)
5) एक चमचा तूप
6) अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, चिमुटभर मीठ .
हेही वाचा: घरच्या घरी बनवा चविष्ट लोणचं; पाहा रेसिपी
आंबा सांदण कृती:
भाजलेला इडलीचा रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकजीव करुन घ्यावे.
नंतर या मिश्रणात लागेल तितक पाणी घालुन इडलीच्या पिठा सारखं सरसरीत भिजवून एक तासभर बाजुला ठेवून द्यावे.
जेणेकरून रवा चांगला भिजेल जर का एखाद्या वेळेला पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध टाकाव.
नंतर त्या मिश्रणात बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिश्रण पुन्हा एकदा चांगले फेटुन घ्यावे .
पुढे मग इडली पात्राच्या साचाला थोडसं तुप लावुन हे मिश्रण घालून इडली सारखं 12 ते 15मिनिटं वाफवून घ्यावं.
वाफवून झाल्यानंतर पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की इडलीच्या साच्यातून सांदण काढावीत आणि मस्त साजुक तुप टाकुन गरम गरम खावुन टाकावीत.
Web Title: Special Mango Food How To Make Mango Sandan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..