esakal | उन्हाळ्याच्या दिवसांत ही स्पेशल चटणी नक्की ट्राय करा

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्याच्या दिवसांत ही स्पेशल चटणी नक्की ट्राय करा
उन्हाळ्याच्या दिवसांत ही स्पेशल चटणी नक्की ट्राय करा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोणत्याही चटणीसोबत जेवण केल्यास त्याचा स्वाद डबल होतो. जर एखादी भाजी मनासारखी नसेल तर तुम्ही चटपटीत चटणी सोबत जेवण करता. आज आम्ही तुम्हाला अशी स्पेशल चटणीची रेसिपी सांगणारा आहोत जी खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात बनवून खाल्ली जाते. ही चटणी थोडी वेगळ्या प्रकारची आहे परंतु जेवणासोबत खाण्यासाठी याला सर्वजण पसंती देतात. एकदा का तुम्ही ही चटणी बनवून पाहिली तर याची चव नेहमी तुमच्या जिभेवर रेंगाळत राहिली. चला तर मग ही रेसिपी जाणून घेऊया..

बनवण्याची पद्धत

ही चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला कांदा स्वच्छ धुऊन चिरून घ्या. सोबतच आंब्याला धुवून कट करून घ्या. यामध्ये कांदा इतकाच घालायचा आहे जो आंब्याच्या आंबटपणा बरोबर व्यवस्थित मॅच होईल. यानंतर कांद्याला उभ्या आकाराच चिरून घ्या. आणि आंबा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्या. लसूण सोलून घ्या. त्यानंतर मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. एका बाउलमध्ये पाणी घ्या. यामध्ये साधारणत: मिरची बुडेल इतकचे प्रमाण घ्या. हे पाणी एक ते दोन मिनिटांसाठी गरम करा. गरम केल्यामुळे मिरची सॉफ्ट होईल आणि चटणीचा रंग वाढण्यास मदत होईल. आता गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. यानंतर मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये लाल मिरची, कैरी, लसुन याची पेस्ट करून घ्या. हे मोठ्या मोठ्या आकारात भरडून, वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये कांदा घाला. परंतु हे वाटायचे प्रमाण मोठे ठेवायचे आहे. अशा पद्धतीने तुमची चटणी तयार होईल. ही तुम्ही तुमच्या जेवणाची टेस्ट वाढवण्याचे काम करेल.

साहित्य -

  • कांदे मोठे - 3

  • कैरी छोटी - 1

  • लसुण कळ्या - 4

  • लाल मिरची - 8-10

  • चवीनुसार मीठ

कृती -

चटणी बनवण्यासाठी सर्व साहित्य स्वच्छ धुवून घ्या. यानंतर याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करा. यानंतर मिरचीला गरम पाण्यात थोडसं उकळून घ्या. यानंतर मिक्सरमध्ये या मिश्रनाची पेस्ट करून घ्या. तुमची चटणी तयार होईल. तुम्ही तुमच्या जेवणासोबत सर्व्ह करू शकता.